या 2 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होते मोठे नुकसान

काळा धागा बांधताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

Updated: Jan 4, 2022, 10:43 PM IST
या 2 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होते मोठे नुकसान title=

मुंबई : बहुतेक लोक त्यांच्या मनगटावर किंवा पायावर काळा धागा बांधतात. काही लोक ते चांगले दिसण्यासाठी वापरतात, तर काही लोक वाईट नजर टाळण्यासाठी वापरतात. ज्योतिषी मानतात की काळा रंग वाईट नजर किंवा वाईट शक्तींपासून संरक्षण करतो. असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती वाईट नजरेने एखाद्याकडे पाहते तेव्हा त्यापासून बचावासाठी काळ्या रंगाचा वापर केला जातो. 

असेही मानले जाते की काळा धागा पाहणाऱ्यांचे लक्ष विचलित करतो. ज्यामुळे व्यक्ती वाईट प्रभावापासून वाचते. परंतु प्रत्येकाने काळा धागा घालू नये. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण दोन राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये. या मागचे मुख्य कारण जाणून घ्या.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ देव यांना काळा रंग आवडत नाही. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी काळा धागा बांधला तर त्यांना जीवनात अडचणी येतात. तसेच काळ्या रंगाच्या वापरामुळे मनाची चंचलता, विनाकारण नैराश्यात राहणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळेच मेष राशीने काळा धागा घालू नये. मेष राशीसाठी लाल रंगाचा वापर शुभ आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीचा शासक ग्रह देखील मंगळ आहे. या राशीच्या लोकांसाठी काळ्या रंगाचा वापर फारच अशुभ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा बांधल्यास मंगळदेवाचा कोप होतो. ज्याचा थेट परिणाम जीवनावर होतो. अशा स्थितीत वृश्चिक राशीच्या लोकांनीही काळ्या रंगापासून अंतर ठेवावे. वास्तविक काळा धागा बांधल्याने मंगळाचा शुभ प्रभावही संपतो. त्यामुळे जीवनात गरिबी येऊ लागते. वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाचा धागा घालणे शुभ असते.

कोणत्या राशीचे लोक काळा धागा बांधू शकतात

तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी काळा धागा घालणे शुभ असते. कारण कुंभ आणि तुला राशीवर शनीचा प्रभाव आहे. तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना काळा धागा बांधल्याने जीवनात प्रगती होते. तसेच, तुम्हाला पैशाशी संबंधित समस्येचा सामना करावा लागणार नाही.