Kamika Ekadashi 2023 : आज आषाढातील दुसरी एकादशी! जाणून घ्या पूजेचा वेळ, महत्त्व आणि कथा

Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशी आहे. आषाढी, चातुर्मासातील ही दुसरी एकादशी आहे. मोक्ष प्राप्त विष्णुपूजेची वेळ, महत्त्व जाणून घ्या.   

Updated: Jul 13, 2023, 06:29 AM IST
Kamika Ekadashi 2023 : आज आषाढातील दुसरी एकादशी! जाणून घ्या पूजेचा वेळ, महत्त्व आणि कथा  title=
kamika ekadashi 2023 today 13 july shubh muhurat vrat parana time sawan ekadashi

Kamika Ekadashi 2023 : आषाढी एकादशी झाल्यानंतर आज कामिका एकादशी आहे. एकादशी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. पंचांगानुसार कृष्ण पक्षातील 11 व्या दिवशी कामिका एकादशीचं व्रत साजरा केलं जातं. कामिका एकादशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. यादिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चा केली जाते. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एकादशी अजून खास आहे. (kamika ekadashi 2023 today 13 july shubh muhurat vrat parana time sawan ekadashi)

कामिका एकादशी 2023 मुहूर्त

पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील कामिका एकादशी तिथी बुधवारी म्हणजे 12 जुलै 2023ला सायंकाळी 05:59 वाजता सुरु झाली आहे. आज गुरुवारी 13 जुलै 2023 ला संध्याकाळी 06:24 वाजेपर्यंत असणार आहे. 

विष्णुजींच्या पूजेची वेळ - सकाळ 05.32 - सकाळ 07.16
सकाळची वेळ - सकाळी 10.43 ते दुपारी 12.27

कामिका एकादशी 2023 व्रत पारणाची वेळ

कामिका एकादशीचं व्रतासाठी 14 जुलै 2023 ला सकाळी 05.32 ते 08.18 पर्यंत शुभ काळ आहे. एकादशीचं पारण द्वादशी तिथी संपण्यापूर्वी करावं लागतं असून या दिवशी द्वादशी तिथी 07.17 मिनिटांनी ते संपतं. 

कामिका एकादशीचे महत्त्व

धर्मग्रंथानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या वेळी केदार आणि कुरुक्षेत्रात स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. ते पुण्य कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा केल्याने प्राप्त होते, असं म्हटलं जातं. हे व्रत केल्याने मनुष्याला यमराज दिसत नाहीत आणि नरक यातनाही भोगाव्या लागत नाही.  जाचकाला स्वर्गाचा स्वामी प्राप्त होतो अशी मान्यता आहे. 

कामिका एकादशी पूजा विधी 

सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर पूजेची खोली स्वच्छ करा. 

आता एक लाडकी पाट घ्या आणि त्यावर श्रीयंत्रासह भगवान विष्णू, श्रीकृष्णाची मूर्ती ठेवा. 

आता त्यांची पूजा करा, पिवळी फुलं, पिवळ्या कपडे अर्पण करा. 
आता पंचामृत, पंचमेव, फळं आणि घरगुती मिठाईचा नवैद्य दाखवा. 

या मंत्राचा जप केल्या फायदा होईल

 ओम नमो भहवते वासुदेवाय
ओम नमो नारायणाय
श्रीमन् नारायण नारायण हरि हरि
अच्युतम केशवम् कृष्ण दामोदरम राम नारायणम् जानकी वल्लभम्
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा

हेसुद्धा वाचा - Rajadhiraja Yoga : रंकाचाही राजा करतो 'हा' अदभूत योग; पाहा तुमच्या पत्रिकेत आहे का?

 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)