Janmashtami 2024 Horoscope : जन्माष्टमीला गजकेसरी राजयोग! या राशींना प्रगतीसह आर्थिक लाभ, श्रीकृष्णाचाही मिळणार आशीर्वाद

Janmashtami 2024 : चौथ्या श्रावण सोमवारसह जन्माष्टमीला अजून एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशींवर श्रीकृष्णाची कृपा बरसणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 24, 2024, 04:10 PM IST
Janmashtami 2024 Horoscope : जन्माष्टमीला गजकेसरी राजयोग! या राशींना प्रगतीसह आर्थिक लाभ, श्रीकृष्णाचाही मिळणार आशीर्वाद title=
Janmashtami Gajakesari Rajayoga These zodiac signs will get financial benefits along with progress blessings of Lord Krishna

Janmashtami 2024 Horoscope : श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा जन्माष्टमी अतिशय खास असणार आहे. यंदा जन्माष्टमीला चौथा श्रावण सोमवार असून एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 5251 वर्षांनंतर या दिवशी सूर्य रोहिणी नक्षत्रासोबत सिंह राशीत, चंद्र वृषभ राशीत आणि जयंती योग तयार होत आहे. धर्मशास्त्रानुसार जयंती योगामध्ये उपवास केल्यास शाश्वत पुण्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी शुक्रादित्य, षष्ठ राजयोगासोबतच वृषभ राशीमध्ये गुरू आणि चंद्राचा संयोगातून गजकेसरी राजयोगगदेखील आहे. हा योग काही राशींच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. (Janmashtami Gajakesari Rajayoga These zodiac signs will get financial benefits along with progress blessings of Lord Krishna)

मेष (Aries Zodiac)   

या राशीच्या लोकांवर श्रीकृष्णाची विशेष कृपा बरसणार आहे. या राशीच्या दुसऱ्या घरात गजकेसरी योग निर्माण होणार आहे. यासोबतच मंगळ तिसऱ्या भावात आणि बुध चतुर्थ भावात उगवणाराय. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीतही वाढ होणार आहे. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. गुरू आणि वडिलांच्या मदतीने तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होणार आहेत.  त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार असून कर्ज फेडण्यात यश प्राप्त होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. करिअरमध्येही मोठं यश मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; 'असे' करा जन्माष्टमी व्रत

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीचा दिवस खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांना गुरु, शुक्र तसंच इतर ग्रहांची शुभ दृष्टी असणार आहे. या राशीचे लोक आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर अनेक क्षेत्रात यशाची पताका फडकवणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना दुसरी नोकरी मिळण्याची दाट शक्यता असणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करणार आहात. कार्यालयातील अनेक दिवसांपासून सुरू असलेली समस्या आता सुटू शकणार आहे. तुम्ही तुमच्या कामात समाधानी असणार आहात. बोलण्यात गोडवा राहणार आहे. अचानक आर्थिक फायदा मिळणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या दिव्य ठिकाणी जाणार आहात. धार्मिक बाबींमध्ये वाढ होणार आहे. कान्हाच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. परदेशात जाण्याचीही संधी मिळणार आहे. नवीन घर, वाहन किंवा कोणतीही मोठी मालमत्ता घेण्याचे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळणार आहे. तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागेल, मात्र त्यावर तुम्ही सहज मात करणार आहात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)