मेष : आजच्या दिवसात वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होणार आहे. तुमच्या कामामुळंच ही प्रशंसा तुमच्या वाट्याला येणार आहे. तरुणांनी रागावर ताबा ठेवा, सर्वकाही सुरळीत होणार आहे.
वृषभ- नोकरीच्या ठिकाणी सतर्कता राखा. तुमच्या अंतर्मनाची ताकद ओळखा आणि त्या मार्गावर पुढे जा. शिक्षण आणि नोकरीच्या ठिकाणा प्रगतीची संधी आहे.
मिथुन- कागदोपत्री व्यवहार अडकलेला असल्यास तो मार्गी लागेल. रेंगाळलेली कामंही पूर्णत्वास जातील . आजचा दिवस शुभ आहे. आजारपण दूर जाणार आहे, पथ्यपाणी पाळा.
कर्क- इंजिनियरिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. शिक्षणाच्या वाटा खुल्या होणार आहेत. एखादा परदेश दौरा आखाल.
सिंह- सहकाऱ्यांच्या मदतीनं तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे. आज एखादा मोठा निर्णय घ्याल. अडचणी येतील पण, त्यावरही मात कराल.
कन्या- आरोग्याची काळजी घ्या, आजारपण दूर होण्याच्या मार्गावर आहे. चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे. दिवसही चांगलाच असणार आहे.
तुळ- एका नव्या व्यवसायाची सुरुवात कराल. आनंदाचे दिवस तुमच्या दाराशी आहेत. आत्मविश्वास वाढेल. पाठीचे त्रासही दूर होतील.
वृश्चिक- आतापासून टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर टाळा. डोळ्यांची काळजी घ्या. सुख सुविधांचा उपभोग घेण्याची सवय लावा.
धनू- कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरणार आहे. विवाहयोग फायद्याचा ठरणार आहे. जीवनातील नव्या सुरुवातीसाठी तयार राहा. प्रगतीपथावर धनलाभाचीही संधी आहे.
मकर- कामाच्या व्यापातून वेळ काढून सहलीला जाण्याचा बेत आखाल. एखाद्या जुन्या मित्राला भेटाल. जुन्या ओळखींचा फायदा होणार आहे.
कुंभ- सरकारी नोकरदारांना फायदा होणार आहे. एखाद्या दौऱ्यासाठी तयार व्हा, सहलीचा योग आहे. नकारात्मक विचार दूर ठेवा. धनलाभ होण्याची संधी आहे.
मीन- करिअरच्या क्षेत्रामध्ये नव्या वाटांवर पुढे जाल. आरोग्याची काळजी घ्या. तुमचा स्वभाव सर्वांची मनं जिंकेल.