Horoscope today: 'या' राशींच्या व्यक्तींनी मिळणार सन्मान

कोणती आहे तुमची रास?  'या' राशींच्या व्यक्तींसाठी खास दिवस  

Updated: Sep 13, 2022, 07:46 AM IST
Horoscope today: 'या' राशींच्या व्यक्तींनी मिळणार सन्मान  title=

मेष- व्यापारासाठी वेळ चांगला नाही आहे. कोणालाही उधार देण्यापूर्वी विचार करा. काही जुन्या गोष्टींमुळे चिंता सतावेल. नोकरीवर असणाऱ्यांनी सावध राहा. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

वृषभ- विचारात असणारी कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. विचार करण्याचा दृष्टीकोन बदलेल. योजन आखत काही बेत पूर्ण कराल. मित्रपरिवार आणि कुटुंबाची साथ मिळेल. समाजात सन्मान वाढेल. 

मिथुन- व्यापाराच्या बाबतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. साथीदाराचं सहकार्य मिळेल. त्यांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. इतरांशी चांगली वाणी ठेवून तुमची कामं पूर्ण करुन घेऊ शकता. आरोग्याची काळजी असेल. 

कर्क- कामाच्या ठिकाणी काही गोष्टी मनाविरुद्ध घडणार असल्यामुळे तुमची चिडचीड होईल. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्या वादावर कोणताही निर्णय घेता येणार नाही. दैनंदिन कामांमध्ये अडचणी येतील. कोणावर अवलंबून राहू नका. 

सिंह- आत्मविश्वास वाढलेला असेल. आज तुम्ही इतरांना प्रभावित कराल. तुमचा विचार करण्याचा दृष्टीकोन इतरांच्या पसंतीस उतरेल. तुम्ही दिलेल्या सल्ल्यांचा इतरांना फायदा होईल. सांधेदुखी बळावेल. समाजात सन्मान वाढेल. 

कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक स्थिती संतुलित असेल. ज्य़ामुळे तुमच्या कौटुंबीक जीवनात आनंदाचं वातावरण असेल. काही कामं पूर्णत्वास जाऊ शकण्याची चिन्हं आहेत. करिअर आणि गुंतवणूकीच्या काही नव्या संधी मिळण्याची चिन्हं आहेत. पैशांच्या स्थितीवर लक्ष द्या. 

तुळ- मेहनत करा, यश मिळेल. तुमच्या मनीच्या इच्छा पूर्ण होतील. बढती मिळण्याची संधी आहे. कोणतीही संधी हातची जाऊ देऊ नका. जे काम हाती घ्याल त्यात इतरांची अपेक्षित मदत होईल. आरोग्य सर्वसामान्य असेल. 

वृश्चिक- आर्थिक नुकसान होण्याची चिन्हं आहेत. काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकाल. वेळेला महत्त्वं द्या. काही खास कामांमध्ये जास्त परिश्रम घ्यावे लागतील. कोणा एका अनपेक्षित घटनेनंतर तातडीने निर्णय घेऊ नका. समाजात सन्मान वाढेल. 

धनु- शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वकपणे गुंतवणूक करा. वरिष्ठांशी तुमच्या समीकरणांवर लक्ष ठेवा. ज्या व्यक्ती तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्याच व्यक्तींकडून काही अडचणी उभ्या केल्या जातील. जी कामं पूर्ण होण्याची अपेक्षा आहे ती न झाल्यास निराश होऊ नका. 

मकर- तुमचं नुकसान होऊ शकतं. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबामध्ये आर्थिक व्यवहाराच्या मुद्द्यावरुन वाद होतील. जास्तीची जबाबदारी मिळेल. पैशांच्या बाबतीत सावध आणि चौकस राहा. आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ- करिअरच्या दृष्टीने शुभवार्ता कळेल. शत्रूला तुम्ही भारी पडाल. जुने वाद मिटवण्याच्या प्रयत्नात असाल आणि परिस्थिती तुमच्या पक्षात करण्यात यशस्वी ठराल. नोकरी करणाऱ्या वर्गासाठी दिवस चांगला आहे. गुंतागुंत सुटेल. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन- समाजात सन्मान वाढेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. आज तुम्ही इतरांना प्रभावित कराल. तुमचा विचार करण्याचा दृष्टीकोन इतरांच्या पसंतीस उतरेल.