वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल २०१९ हे नवीन वर्ष?

कसं असेल नवीन वर्ष तुमच्यासाठी?

Updated: Dec 31, 2018, 04:47 PM IST
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल २०१९ हे नवीन वर्ष? title=

मुंबई : जगभरात नव्या वर्षाची धूम आहे. त्यातच वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष कसं असणार आहे. कोणत्या नवीन गोष्टी यावर्षात असणार आहे. जाणून घ्या.

राशी फळ : नवीन वर्षात शनीची साडेसाती हा मोठा फॅक्टर असणार आहे. हे वर्षात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मानसिक तणावापासून लांब राहा. ऑक्टोबर महिना हा सर्वात शुभ असेल.

करिअर : नोकरी करणाऱ्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागेल. काही ऑफर येऊ शकतात. व्यापार वाढवण्यासाठी काही वेळा प्रवास करावा लागू शकतो. व्यापारात गुंतवणूक कराल.

कौटुंबिक जीवन : कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. काही समस्या दूर होईल. कुटुंबासोबत काही खास वेळ घालवाल. वरिष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. नवीन लोकांचा संपर्क वाढेल.

आर्थिक स्थिती : जास्त काळासाठी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. सप्टेंबरच्या आधी अडकून पडलेला पैसा मिळेल. प्रॉपर्टीसाठी गुंतवणूक करु शकता. व्यवहार करताना सावधपणे करावा लागेल.

आरोग्य : आरोग्यासाठी नवीन वर्ष चांगलं आहे. जुन्या समस्या दूर होतील. डोळे आणि घशाची समस्या होऊ शकते. जेवणाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल.