धनु राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल २०१९ हे वर्ष?

२०१९ चं राशी भविष्य

Updated: Dec 31, 2018, 03:39 PM IST
धनु राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल २०१९ हे वर्ष? title=

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण ही सज्ज आहात. नवीन वर्षात काय आहे तुमच्यासाठी खास, कसं असेल तुमच्यासाठी नवीन वर्ष? करियर, कौटुंबिक जीवन, आर्थिक स्थिती आणि आरोग्य याबाबत जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

राशी फळ : धनु राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष सामान्य आहे. या वर्षात सर्तकता, पूर्वअनुमान आणि तुमचं कौशल्य याबाबत परीक्षा होणार आहे. नकारात्मक विचार करु नका. नकारात्मक आणि चुकीच्या व्यक्तींपासून लांब राहा.

करिअर : नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पुढे जाण्याची संधी आहे. काही बाबतीत जास्त मेहनत घ्यावी लागेल. अधिक उत्पन्न कमवण्यासाठी संधी येतील. पदोन्नतीचा देखील योग आहे. 

कौटुंबिक जीवन : कौटुंबिक जीवन देखील सामान्य असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले संबंध राहतील. बाहेर फिरण्याचा योग येईल. मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्याल. पार्टनरच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. प्रेम संबंध घट्ट होण्यासाठी प्रयत्न कराल.

आर्थिक स्थिती : आर्थिक गोष्टी सांभाळतान सावध राहा. पैशांचा व्यवहार लक्षपूर्वक करा. गाडी किंवा घर खरेदी करु शकता. धन लाभ होण्याची देखील शक्यता आहे.  

आरोग्य : आरोग्य चांगलं राहिल. छाती, त्वचा आणि डोळे याबाबतच्या काही समस्या येऊ शकतात. कुटुंबातील वरिष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. एप्रिलनंतर आरोग्य चांगंल राहिल.

यावर्षी धनु राशीच्या व्यक्तींना आरोग्यासंबंधित समस्या मागच्या वर्षाच्या तुलनेत कमी राहतील. हृदयरोग, पोटाचे विकार याकडे लक्ष द्या. 15 मार्च ते जूनचा चांगला नाही आहे. राजकारण आणि प्रशासन संबंधित व्यक्तींसाठी हे वर्ष श्रेय देणारं ठरेल. आर्थिक स्थिती काही प्रमाणात चांगली होईल.