Horoscope October 2023 : ऑक्टोबरमध्ये राहू-केतूसह 6 ग्रहांचं संक्रमण, 'या' 5 राशींचं नशीब उजळेल, 12 राशींसाठी हा महिना कसा राहील?

Monthly October Horoscope 2023 : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी कसा असेल ऑक्टोबर महिना जाणून घ्या.

नेहा चौधरी | Updated: Sep 30, 2023, 10:00 AM IST
 Horoscope October 2023 : ऑक्टोबरमध्ये राहू-केतूसह 6 ग्रहांचं संक्रमण, 'या' 5 राशींचं नशीब उजळेल, 12 राशींसाठी हा महिना कसा राहील? title=
horoscope october 2023 monthly horoscope masik rashifal october all zodiac signs astrology news in marathi

October Horoscope 2023, October Masik Rashifal : ऑक्टोबर महिन्यात बुध, शुक्र, मंगळ, सूर्य आणि राहू केतूचं यांचं गोचर होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी ऑक्टोबर महिना (Monthly Horoscope in Marathi) कसा असेल जाणून घ्या. (horoscope october 2023 monthly horoscope masik rashifal october all zodiac signs astrology news in marathi)

मेष ( Aries October horoscope 2023) 

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तणाव असणार आहे. मन अस्वस्थ असेल. पैसा गुंतवताना लक्षपूर्वक करा, काही नुकसान होण्याची भीती आहे. अपयशाचा सामना करावा लागू शकतो. नोकरी बदलण्यासाठी योग वेळ आहे. आरोग्य उत्तम असेल. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. 

उपाय : दुर्गास्तोत्राचा पाठ करा.

वृषभ (Taurus October horoscope 2023) 

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना आनंदी आनंद असेल. या लोकांच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. मोठे यश मिळू शकतं. पालक आणि मित्रांकडून कामात सहकार्य मिळेल. कोणाशी वाद सुरु असल्यास तो संपुष्टात येईल. तुम्ही वेबसाइटशी कनेक्ट असाल तर तुमचा व्यवसाय यश मिळेल. ऑक्टोबर महिन्यात आर्थिक लाभ होईल.

मिथुन (Gemini October horoscope 2023)

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप सकारात्मक असणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्यांना फायदा होईल. मालमत्ता खरेदीच्या विचारात असाल तर हा योग्य महिना आहे. व्यवहारात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी मान मिळणार आहे. तुमच्या कामाबद्दल तुमचे वरिष्ठ कौतुक करणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही हा महिना उत्तम असेल. 

कर्क (Cancer October horoscope 2023)

ऑक्टोबर महिना या राशीच्या लोकांसाठी संमिश्र असेल. या महिन्यात कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक गोष्टी घडतील. तुम्ही नियोजित केलेली सर्व कामं सहजासहजी पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होईल. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागणार आहे. कुटुंबातील सदस्यासोबत वाद होण्याची भीती आहे. यामुळे मनही खूप अस्वस्थ असणार आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी ऑक्टोबर महिन्यात वाहन सावकाश चालवावे. आरोग्याकडे लक्ष द्या. 

उपाय : दुर्गा मातेची पूजा करा. नवरात्रीत लाल चुनरी अर्पण करा. 
 

सिंह (Leo October horoscope 2023)

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या आळस काम बिघडवेल. एक काम हातात असल्यास दुसरं काम हातात घेऊन नका. नियोजित काम आधी पूर्ण करा. महिन्याच्या सुरूवातीला कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची भीती आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात तुमचा शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतो, त्यामुळे सावध राहा. महिन्याच्या उत्तरार्धात काळ तुमच्यासाठी चांगला असेल. वैवाहिक जीवनात आनंदी आनंद वातावरण असेल. 

उपाय : सोमवारी भगवान शिवाला जलाभिषेक करा. त्याशिवाय बेलपत्रीवर रामाचे नाव लिहून ते अर्पण करा. 

कन्या (Virgo October horoscope 2023) 

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार आहे. अवाजवी खर्चामुळे घराचे बजेट बिघडणार आहे. कामाच्या ठिकाणी  विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरदारांसाठी हा महिना चांगला असणार आहे. तुमचं वरिष्ठांशी वाद होण्याची भीती आहे. तुमच्या मनात नोकरी बदलण्याचा विचार येईल. नोकरी बदलचा निर्णय विचारपूर्वक घ्या. करिअर आणि बिझनेसच्या संदर्भात तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आरोग्यातही चढ उतार असेल. 
उपाय : घरी बनवलेली पहिली चपाती गायीला खाऊ घाला.

तूळ (Libra October horoscope 2023)

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असणार आहे. विरोधक तुम्हाला त्रास देणार आहेत. विरोधकांपासून नेहमी सावध राहा. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या जोडीदारावर जास्त विश्वास ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कमी पाठिंबा मिळणार आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. या महिन्यात व्यवसायात थोडी मंदी असेल. कोणालाही कर्ज देऊन नका किंवा पैसे गुंतवू नका. महिन्याचा उत्तरार्ध काहीसा चांगला जाणार आहे. 
उपाय : भगवान विष्णूची पूजा करून केशराचा तिलक लावा.

हेसुद्धा वाचा - Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

वृश्चिक (Scorpio October horoscope 2023)

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप सकारात्मक असेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. नोकरदार लोकांना त्यांचे इच्छित पद मिळेल. ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करणार आहेत. व्यवसायामुळे तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावं लागणार आहे. प्रवास खूप फायदेशीर असेल. जर तुम्ही दीर्घ आजाराने त्रस्त असाल तर तुमची मुक्तता होणार आहे. घरामध्ये काही शुभ होणार आहे. अध्यात्मिक कार्यात रुची वाढणार आहे. पत्नीसोबत आध्यात्मिक प्रवासाला जाण्याचे योग आहेत.

धनु (Sagittarius October horoscope 2023)

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना कठोर परिश्रमाने भरलेला असणार आहे. कठोर परिश्रमामुळेच प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. घरात आणि समाजात मान सन्मान वाढणार आहे. नोकरदार लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचं साधन गवसणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणार आहात. तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होणार आहे. कोर्टातील प्रकरण तुमच्या बाजूने लागणार आहे. जोडीदाराबरोबर आनंदी क्षण घालवणार आहात. वैवाहिक जीवनही आनंदी असेल. 

मकर (Capricorn October horoscope 2023)

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ असणार आहे. कोणतेही काम सुरू करताना आनंदाने करा. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नोकरदार लोकांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्या समन्वयाने काम प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. व्यवसायात तुमच्या बोलण्याने आणि शहाणपणामुळे फायदा होणार आहे. मोठी धनलाभ होणार आहे. व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला मोठे पद मिळणार आहे. समाजात मान-प्रतिष्ठा लाभणार आहे. या महिन्यात मात्र तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिना सकारात्मक असणार आहे. 

कुंभ (Aquarius October horoscope 2023) 

या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असणार आहे. महिन्याची सुरुवात चढ-उताराने भरलेला असेल. काम बिघडण्याची शक्यता आहे. घाईने एखादे काम करु नका, नुकसान होईल. शॉर्टकट घेतल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. करिअर आणि बिझनेसमुळे तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवास थकवणारा असेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा महिना तुमच्यासाठी नकारात्मक असेल. काही जुने आजार परत त्रासदायक ठरतील. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. 

उपाय: शनिवारच्या दिवशी बजरंग बाणचं पठण करा. 

मीन (Pisces October horoscope 2023)

ऑक्टोबर महिनाही तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी वेळ आधीच नकारात्मक असल्याने यशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नोकरदारांवर कामाचा ताण असेल. यामुळे तुम्ही खूप तणावाखाली असणार आहात. विरोधकापासून सावध राहा, अन्यथा तो तुमच्यावर भारी पडेल. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, अन्यथा वाद पडाल. विद्यार्थ्यांनाही अभ्यास करावे. या महिन्यात तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमतरता जाणवणार आहे. मीन राशीच्या लोकांनी गाडी सावधपणे चालवावी. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार असून घराचे बजेटही बिघणार आहे. तुमची प्रकृतीही साथ देणार नाही. 

उपाय : मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)