मेष- एकांतात काही वेळ व्यतीत करा, फायद्याचं ठरेल. कामाच्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. आज कोणा एका व्यक्तीला तुमच्या मनाची गोष्ट पटवून सांगण्यात यशस्वी ठराल.
वृषभ- विचाराधीन असणारी कामं पूर्णत्वास जाण्याचे पूर्ण योग आहेत. नोकरी किंवा दिनचर्येत बदल करण्याविषयी थोडा विचार करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जूने वाद शमवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे.
मिथुन- आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. कुटुंबात लहानांची मदत होईल. कामाच्या ठिकाणी धनलाभाची शक्यता आहे. पदोन्नतीची शक्यता आहे. आज कामं पूर्ण करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करा. व्यग्र असूनही आजचा दिवस चांगला आहे.
कर्क- कामाच्या ठिकाणी मनमिळावू वातावरण नसल्याने मन नाराज राहिल. खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण होतील. रोजच्या वाढत्या कामांमुळे समस्या वाढतील. कोणावरही आधारीत राहू नका. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील.
सिंह- आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही इतरांना प्रभावीत कराल. तुमचे विचार करण्याचे मार्ग लोकांना आकर्षित करतील. तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा फायदा लोकांना होण्याची शक्यता आहे. चांगल्या बातमीची प्रतिक्षा असेल. खाजगी आयुष्यासाठी दिवस सामान्य राहिल. गुडघ्यांच्या आजारांनी त्रस्त राहाल.
कन्या- कुटुंबाकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. तुमची मानसिक स्थिती संतुलित राहिल. काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. करियर आणि गुंतवणूकीत खास संधी मिळण्याची शक्यता आहे. पैसा आणि कुटुंबाकडे पूर्ण लक्ष राहिल. आरोग्यात सुधार होऊ शकतात.
तूळ- मेहनतीचे फळ मिळेल. इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळण्याची शक्याता आहे. कोणत्याही प्रकारची संधी गमावू नका. लोकांकडून कामे करून घेण्यास यश मिळेल. नवीन कामास प्रारंभ केल्यास इतरांकडून मदत मिळेल. दिवस चांगला आहे. आरोग्य सामान्य राहिल.
वृश्चिक- आर्थिक व्यवहात नुकसान होण्याची शक्यता आहे. काही कायदेशीर गोंधळांमध्ये अडकू शकता. जास्त मेहनत करण्याची गरज आहे. जे बदल होत असतील ते तुमच्या प्रगतीसाठी गरजेचे आहेत. कुटुंबातील लोकांची मदत मिळू शकते.
धनु- पैशांच्या बाबतीन विचारपूर्वक निर्णय घ्या. साथीदाराचा सल्ला फायद्याचा ठरु शकतो. अर्थार्जनाचे नवे बेत आखू शकता. नोकरीत एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सल्ल्यांचा इतरांना फायदा होऊ शकतो.
मकर- व्यापारात अचानक धनलाभ होईल. साथीदाराकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. साथीदाराचे सल्ले महत्वपूर्ण ठरू शकतात. अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. काही चांगल्या संधी मिळू शकतात. गोड बोलूण काम करूण घ्याल. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवतील. आहाराकडे विशेष लक्ष द्या.
कुंभ- विचार केलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचार शक्तीत सकारात्मकता जाणवेल. मुलांकडून सहकार्य मिळेल. आखलेले बेत मेहनतीने पूर्ण करा. त्याचे फळ नक्कीच मिळेल. अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या संधी मिळू शकतात.
मीन- व्यावसाय करणाऱ्यांसाठी दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. कोणाला पैसे उधार देऊ नका. जूने केलेले व्यवहार तणावास कारणीभूत ठरतील. नोकरी करणाऱ्यांनी सावध राहा. ऑफिस मध्येअडचणींचा सामना करावा लागेल. काही कारणांमुळे तणाव येईल. मानसिक तणाव वाढेल.