मुंबई : Horoscope January 26, 2022 : बुधवारी सिंह राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा. दुसरीकडे, तूळ राशीचे लोक एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणाऱ्या लोकांना टेन्शन देऊ शकतात. ज्योतिषी बेजान दारुवाला यांचा मुलगा चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घ्या, बुधवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
मेष: आज तुम्हाला तुमच्या घरात प्रेम आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करु शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. तसेच न्यायालयाच्या कामातून मुक्तता होऊ शकते. बुधवारी तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करु शकाल. याशिवाय, तुम्ही जोखीमीची कामे टाळा.
वृषभ : बुधवारी चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला लाभाचे नवीन मार्ग दिसतील. तसेच, लहानमोठ्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : हा बुधवार स्वतःसाठी वेळ काढणे चांगले राहील. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील.
कर्क : बुधवारी तुम्हाला तुमच्या मनाचे ऐकण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी डीलरसाठी बुधवार अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
सिंह: अधिकाऱ्यांकडून तुम्हाला शब्बासकी मिळेल. तसेच इतरांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने बदल घडू शकतात. याशिवाय कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य मिळेल.
कन्या : या बुधवारी तुमच्याशी अनेक संवाद होतील ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जाणकार आणि ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे. तसेच, आर्थिक बाबी तुमच्या बाजूने सोडवता येतील.
तूळ: बुधवारी इतर लोकांसोबत राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि जोश असेल. खाद्यपदार्थ व्यापार्यांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. याशिवाय एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.
वृश्चिक: या बुधवारी तुमची उदार भावना लोकांना खूप प्रभावित करेल. तुम्हाला ऑनलाइन नवीन दागिने खरेदी करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, पटकन पैसे मिळवण्यासाठी, तुम्ही चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवू नका आणि काळजी घ्या. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील. विवाहितांना मुलांचे सुख मिळेल.
धनु : या बुधवारी तुम्ही तुमच्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न कराल. या काळात, तुमचा छंद किंवा कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही काही नवीन काम सुरु करण्याचा निर्णय घ्याल. आर्थिक कामात एकाग्रतेने मन शांत राहील.
मकर : बुधवारच्या दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. घरातून काम करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. रिअल इस्टेटशी संबंधित लोक सवलत देऊ शकतात. व्यवसायात कोणतेही बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळू शकते.
कुंभ : तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे टाळावे. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. जर तुम्ही ऑनलाइन व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना कराव्यात. तसेच रखडलेली योजना पुन्हा सुरु करण्याची हीच योग्य वेळ आहे.
मीन : तुमचा बुधवार चांगला जाईल. नोकरीत तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. यासोबतच तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. सामाजिक आघाडीवर नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. कुटुंबातील तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल.