5 ग्रहांचा महासंयोग 3 राशींसाठी धोक्याचा, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

हा पंचग्रही योग सर्व 12 राशींवर प्रभाव टाकेल.

Updated: Jan 25, 2022, 08:59 PM IST
5 ग्रहांचा महासंयोग 3 राशींसाठी धोक्याचा, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता  title=

मुंबई : नवीन वर्षाचा म्हणजेच 2022 चा पहिला महिना संपत आता आला आहे. या महिन्यात ग्रहांमध्ये झालेल्या बदलांमुळे याचा परिणाम सर्व राशींवर झाला. परंतु 2022 चा दुसरा म्हणजे फेब्रुवारी 2022 महिना हा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप खास असणार आहे. या महिन्यात एकाच राशीत 5 ग्रह एकत्र प्रवेश करणार आहेत. ज्याचा परिणाम संपूर्ण 12 राशींवरती होणार आहे.

हे 5 ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत, यामध्ये मंगळ, शुक्र, बुध, चंद्र आणि शनि यांची एकाचवेळी उपस्थिती आहे. जो खूप मोठा योगायोग आहे. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की, याचा प्रभाव फक्त मकर राशीवर न होता संपूर्ण 12 राशींवर होणार आहे. यामुळे 12 राशीतील लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे.

सध्या शनि, सूर्य आणि बुध मकर राशीत आहेत. दुसरीकडे मंगळ आणि बुध देखील मकर राशीत प्रवेश करून पंचग्रही योग तयार करतील. हा पंचग्रही योग सर्व 12 राशींवर प्रभाव टाकेल.

या 3 राशींसाठी हा योग शुभ सिद्ध होईल. हा पंचग्रही योग मेष, वृषभ आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. करिअरमध्ये प्रगती होईल. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील वजन कमी होईल.

या राशींना त्रास होईल

मकर राशीत तयार होणारा हा पंचग्रही योग हा 3 राशीच्या लोकांसाठी मात्र धोकादायक ठरेल. यामुळे धनु, कुंभ आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण होतील. या काळात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्याच्या समस्याचा देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या आणि याकाळात आर्थिक व्यवहार करु नका

(नोट  : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. 'झी 24 तास' याची पुष्टी करत नाही.)