Horoscope 30 November 2021 | या राशीसाठी मंगळवार 'मंगळ' ठरणार, वाचा राशीभविष्य

मंगळवार (Horoscope 30 November  2021) कसा असेल, हे जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून 

Updated: Nov 29, 2021, 10:26 PM IST
Horoscope 30 November  2021 | या राशीसाठी मंगळवार 'मंगळ' ठरणार, वाचा राशीभविष्य title=

मुंबई : मिथुन, कर्क आणि मेष राशीसाठी मंगळवार (Horoscope 30 November  2021) खऱ्या अर्थाने मंगळ ठरणार आहे. सोबतच वृश्चिक, तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांना यश प्राप्त होईल. मकर राशीला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मंगळवार कसा असेल, हे जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून (Horoscope 30 November 2021 people of this zodiac should be alert) 

मेष (Aries) :  मन प्रसन्न राहिल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात यशस्वी व्हाल.     

वृषभ (Taurus) : कौटुंबिक जीवनात चढ उतार राहिल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. प्रतिष्ठित लोकांशी संबंध प्रस्थापित होतील.  

मिथुन (Gemini) : कामात यशस्वी व्हाल. व्यवसाय करण्याच्या इच्छेला मूर्त रुप देऊ शकता. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer) : दिवसाची प्रसन्न सुरुवात होईल. व्यापारी वर्गाला फायदा होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.  

सिंह (Leo) : दिवसभर तुम्हाला उत्साह जाणवेल. कष्टाचं फल मिळले. शुभ कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. ज्येष्ठांचा आदर राखाल. 

कन्या (Virgo) :  भाग्य तुमच्यासोबत आहे. विद्यार्थी स्पर्धेा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील. मित्राची भेट होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल.  

तुळ (Libra) : नोकरीत यशस्वी व्हाल. कौटुंबिक वाद संपतील. शत्रुवर वरचढ ठराल. भाग्य तुमच्यासोबत आहे. 

वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस अविस्मरणीय ठरेल. गोड स्वभावामुळे कामात यशस्वी व्हाल. हुशारीच्या जोरावर कामं पूर्ण कराल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. 

धनु (Sagittarius) : कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी निकाली निघतील. सर्व कामात यशस्वी व्हाल. इतरांचा सल्ला घेणं लाभदायक ठरेल.  

मकर (Capricorn) : दिवस कोणत्याही विघ्नाशिवाय चांगला जाईल. आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशा परिस्थितीत कुटुंबिय धीर देतील. धीर सोडू नका. परिस्थितीचा न खचता सामना करा. 

कुंभ (Aquarius) : भाग्याची साथ मिळेल. कामात तुम्ही तुमची छाप सोडाल. संवादाच्या जोरावर तुम्ही यशाचं शिखर गाठाल. चांगली बातमी मिळेल. 

मीन (Pisces) : तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. शुभ कार्यात सहभागी व्हाल. स्वत:कडे दुसऱ्यांना आकर्षित कराल. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल.