Horoscope 28 March 2023 : अपघाताची होण्याची भिती; 'या' राशींच्या लोकांसाठी धोकादायक दिवस

 Horoscope 28 March 2023 : येणारा दिवस शुभ अशुभ कसा असेल याचे  संकेत राशीभविष्यात मिळत असतात. जाणून घ्या  28 March हा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल. 

Updated: Mar 27, 2023, 10:19 PM IST
Horoscope 28 March 2023 : अपघाताची होण्याची भिती; 'या' राशींच्या लोकांसाठी धोकादायक दिवस title=

Daily Rashibhavishya Horoscope 28 March 2023 : प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. ग्रह नक्षत्रांच्य स्थितीचा आपल्या राशीवर परिणाम होत असतो. यामुळेच आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. याचे शुभ अशुभ संकेत राशीभविष्यात मिळत असतात. जाणून घ्या  28 March हा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल (Horoscope 28 March 2023). 

मेष (Aries)

नोकरी तसेच व्यापारात बदल केल्यास नुकसान होण्याची भिती आहे. कुणालाही पैसे उधार देऊ नका. गरजेच्या वेळेला मित्र मदतीला धावून येतील. शुभ रंग मरून

वृषभ (Taurus)

मोठ्या प्रवासाचा योग टळू शकतो. जुन्या मित्रांची भेट होईल. दिवभराची धावपळ संपेल. शुभ रंग गुलाबी

मिथुन (Gemini)

महत्वाच्या कामात मोठ्या भावाचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वाद विवाद टाळा. कामानिमित्ताने केलेल्या प्रवासाचा निश्चित लाभ मिळेल.  शुभ रंग निळा

कर्क (Cancer)

व्यवसायात नविन गुंतवणुक करताना सल्ला मसलत करुनच निर्णय घ्या. वाहन चालवताना दुर्लक्ष करु नका. अपघात होण्याची भिती आहे. समाजात मान सन्मान वाढेल.  शुभ रंग केशरी.

सिंह (Leo)

अकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता धूसर. सायंकाळी वेळेवर घरी पोहचा. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. शुभ रंग चॉकलेट. 

कन्या (Virgo)

व्यवसायात लक्षणीय यश मिळेल. अचानक धन लाभ होईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. शुभ रंग नारंगी

तूळ (Libra)

संपत्तीचा लाभ मिळेल. मुलांना नोकरीच्या ठिकाणी मोठे यश मिळेल. नावलौकिक वाढेल. आई वडिलांवर नाराज होऊ नका.  शुभ रंग राखाडी

वृश्चिक (Scorpio)

प्रदीर्घ यात्रेचा योग जुळून येईल. प्रेम संबध यशस्वी होतील. वृद्धांना फळ दान म्हणून द्या. शुभ रंग सफेद

धनु (Sagittarius)

दिवस आनंदी राहील. पुत्र प्राप्तीचा योग येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग लाल

मकर (Capricorn)

महत्वाची काम वेळेवर पूर्ण करा. एखाद्या व्यवसायात अथवा योजनेत गुंतवणुक करायची असल्यास वडिलांचा सल्ला घ्या. नाते सबंध जपा. वाद विवाद कटाक्षाने टाळा. शुभ रंग गुलाबी

कुंभ (Aquarius)

अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होईल. व्यापारात नुकसान होण्याची भिती. नोकरी बदलण्याचा विचार टाळा.  शुभ रंग चॉकलेटी. 

मीन (Pisces)

पहिल्यापेक्षा अधिक मानसिक तणाव येवू शकतो. कोणातही निर्णय घेताना वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. नाते संबंधांमधील वाद विवाद मिटतील. शुभ रंग मरून.