राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींच्या मनोकामना होणार पूर्ण

असं असेल १२ राशींच भविष्य 

Updated: Mar 26, 2020, 07:50 AM IST
राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींच्या मनोकामना होणार पूर्ण  title=

मुंबई : नक्षत्र सतत आपली जागा बदलत असतात. या बदलत्या नक्षत्रांचा आपल्या जीवनावर एक वेगळा परिणाम होत असतो. असाच परिणाम १२ राशींच्या व्यक्तींवर होणार असून त्यांचा आजचा दिवस वेगळा असणार आहे. 

मेष - काही कामात अडचणी येऊ शकतात. मेहनत जास्त घ्यावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्या दिशेने पावलं उचलायला हरकत नाही. मात्र आज सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. जोडीदाराची साथ मिळेल. दाम्पत्य जीवनातील सुख अनुभवाल. 

वृषभ - व्यवसायात फायदा होईल नोकरदार वर्गातील लोकांची पद वाढण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराकडून मदत मिळेल. कामाच्या पद्धतीत बदल करायला हवा. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. 

मिथुन - आजच्या नक्षत्रांची स्थिती तुमच्यासाठी खास आहे. आज तुम्ही सक्रीय असाल. नवीन कामाची जबाबदारी लवकरच मिळमार आहे. रखडलेली काम पू्र्ण होतील. 

सिंह - कुटुंबात सुख-शांती वाढेल. कामात नवीन व्यवहार कराल. यासंबंधीचे महत्वाचे निर्णय अथवा कागदपत्राची कामे आजच करून घ्या. ऑफिसमध्ये कुणी व्यक्तीगत रूपात तुम्हाला मदत करेल. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्या व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त करा. 

कन्या - कामकाज वाढेल यामुळे कामातील व्यस्तता, ताण-तणाव आणि पैशांची उलाढाल सगळंच वाढेल. पण असं असलं तरीही तुम्हाला आज सहकाऱ्यांकडून, कुटुंबाकडून खूप चांगल सहयोग मिळणार आहे. आणि हेच सहकार्य तुम्हाला आणखी बळ देऊन जाणारं ठरेल. रखडलेली सर्व काम आज होतील. दिवस थकवणारा आहे. काळजी घ्या. 

तूळ - नोकरी किंवा बिझनेसमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज थोडी जास्त मेहनत करावी लागेल. मात्र तुम्हाला यश मिळणार हे निश्चित. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. मुलांकरता जी स्वप्न पाहत आहात ती नक्की पूर्ण होतील. 

वृश्चिक - व्यवसायात थोडा कमी फायदा होईल पण नाराज होऊ नका. काम ही अशीच असली तरीही पैशाची अडचण जाणवणार नाही. विचार केलेल्या कामांचा आज सपाटाच लावाल. सर्व काम पूर्ण करून आरोग्याकडे लक्ष द्याल. अविवाहितांनी थोडी अधिक मेहनत करावी. 

धनू - बऱ्याच दिवसांपासून रखडलेली सर्व काम पूर्ण कराल. विचारपूर्वक निर्णय घ्या त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. पैशांची स्थिती बदलणार आहे. धनलाभ होणार आहे. जोडीदारासोबतच नातं आणखी खास होणार आहे. जेवणात तिखट पदार्थ टाळा त्रास होईल. 

मकर - नवीन व्यवहार आज करू नका. थोडा विचार करा मगच या व्यवहारात हात घाला. दिवसाची सुरूवात चांगली नाही. इच्छा नसताना देखील खर्च होईल. यामुळे थोडी चिडचिड होईल पण ती टाळा. कधी कधी आज खर्च केलेला पैसा उद्या दामदुपटीने परत मिळतो. 

कुंभ - आर्थिक तंगी संपणार. खर्च आणि मिळणारा पैसा यामध्ये चांगला मेळ घाला. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळेल. अचानक धन लाभ झाल्यामुळे फायदा होईल. आज काही ठाम निर्णय घ्याल. ज्यामुळे रखडलेली सर्व काम पूर्ण होतील. 

मीन - व्यवहार वाढवण्याच्या दृष्टीकोनातून विचार करा. जे जसं सुरू आहे तसं चालू राहू द्या. आगामी काळात याचा फायदा होणार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. अविवाहितांसाठी आजचा दिवस खास ठरेल. लग्न जुळतील.