Horoscope 21 November 2021 | या 2 राशींच्या लोकांची बिघडू शकते तब्येत, असा असेल रविवार

कसा असेल रविवारचा (Horoscope 21 November 2021) दिवस, वाचा तुमचं राशीभविष्य. 

Updated: Nov 20, 2021, 10:09 PM IST
Horoscope 21 November 2021 | या 2 राशींच्या लोकांची बिघडू शकते तब्येत, असा असेल रविवार  title=

मुंबई | रविवारी सिंह, तुळ राशीच्या लोकांची तब्येत बिघडू शकते. कन्या, कुंभ आणि कर्क राशीच्यांना भाग्याची साथ मिळेल. धनलाभ होऊ शकतो. रविवारचा दिवस (Horoscope 21 November 2021) कसा असेल जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराद दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 21 November 2021 These 2 zodiac signs should avoid going out health may deteriorate know your astrology prediction)

मेष (Aries) : दिवसाची प्रसन्न सुरुवात होईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीत धनलाभ होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापऱ्यांसाठी अनुकूल वेळ आहे. 

वृषभ (Taurus) : तुम्ही दिवसभर उत्साही असाल. कुटुंबियांसोबत खूप वेळ व्यतीत कराल. कामात धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. भाग्याची साथ मिळेल. 

मिथुन (Gemini) : तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हाल. पैसे योग्य आण गरजेच्या वस्तूंवर खर्च होतील. विद्यार्थी परीक्षेत अपेक्षिक कामगिरी करतील, मात्र मनात भिती असेल. उधार देऊ नका. व्यवसाय आणि आर्थिक बाबींबाबत दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे.  

कर्क (Cancer)  : नशिब तुमच्यासोबत आहे. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील मंगळकार्यात सहभागी व्हाल. संपूर्ण दिवस चांगला जाईल. 

सिंह (Leo) :  तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटेल. अपेक्षेप्रमाणे तुम्ही ठरवलेली कामं पूर्ण होतील. 

कन्या (Virgo) : भाग्य तुमच्यासोबत आहे. व्यापार आणि व्यवसायासाठी दिवस उत्तम आहे. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे धनलाभ होण्याची संधी आहे. कामाच्या ठिकाणी मोठे बदल होऊ शकतात. कुटुंबियांच्या दृष्टीने बेफिकीर असाल.
 
तुळ (Libra) : अस्वस्थता वाटेल. प्रकृती स्थिर नसल्याने तुम्हाला अस्वस्थ असल्याचं जाणवेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. नोकरदार वर्गा कामात आलेल्या मोठ्या बदलांमुळे अडचणीत असतील. व्यापारी वर्गासाठी परिस्थिती साधारण असेल. 

वृश्चिक (Scorpio) : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मित्रांसोबत संवाद होऊ शकतो. मन प्रसन्न राहिल. दिवस चांगला जाईल. संघर्षपूर्ण स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

धनु (Sagittarius) : भाग्याची साथ मिळेल. न्यायालयीन कामात यश मिळेल. चारही बाजूने आनंदाची बातमी मिळेल. शारिरीक सुस्ती संपेल. 

मकर (Capricorn) : कुटुंबियासोबत वेळ व्यतीत कराल. त्यांना काय हवंय काय नको, याची काळजी घ्याल. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील. 

कुंभ (Aquarius) :  सर्वांसोबत प्रेमाने वागाल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. समाजाकडून मान सन्मान मिळेल. कार्यालयीन ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. पदोन्नती मिळू शकते. 

मीन (Pisces) : कार्यालयीन ठिकाणी सर्वांना चांगली वागणून द्याल. सहकाऱ्यांकडून वेळोवेळी सहकार्य मिळेल. पाल्यांकडे लक्ष द्या.