Horoscope 2024 in Marathi : बघता बघता 2023 हे वर्ष सरायला आलं. अवघे तीन महिने आणि नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. प्रत्येकाला वाटतं नवीन वर्ष आपल्यासाठी धनसंपदा, प्रगती आणि यश घेऊन यावं. 2024 हे वर्ष काही लोकांसाठी अतिशय खास ठरणार आहे. कर्माचा दाता शनिदेव आणि धनसंपदाचा कारक गुरुदेव यांची कृपा तीन राशींच्या लोकांवर बरसणार आहे. त्यामुळे या तीन राशींसाठी सुख समृद्धी आणि धनसंपदा घेऊन येणार आहे. यातमध्ये तुमची रास आहे का जाणून घ्या. (Horoscope 2024 Guru Gochar and Shani Dev three zodic signs bank balance Rain of money)
या राशीच्या लोकांसाठी येणार नवीन वर्ष 2024 खूप लकी ठरणार आहे. या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ होणार आहे. या लोकांच्या घरात सुख, समृद्धी आणि भरपूर धन दार ठोठावणार आहे. तुम्हाला नवीन वर्षात मान सन्मान प्राप्त होणार आहे. चोहूबाजूने पैशांचा ओघ वाढणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश तुम्हाला शिखरावर घेऊन जाणार आहे. आयुष्यात आनंदच आनंद आणि सकारात्म गोष्टी होणार आहेत.
नवीन वर्षात गुरु ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे वृषभ राशींच्या लोकांसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना नवीन वर्ष 2024 सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीसोबत नवीन नवीन यशाची पायरी तुम्हाला गाठता येणार आहे. आयुष्यात कधी न विचार केलेल्या सकारात्मक आणि आनंददायी घटना घडणार आहेत. व्यापारी आणि ग्लॅमर्स क्षेत्राशी ज्यांच्या संबंध आहे त्या लोकांसाठी नवीन वर्ष भाग्यशाली ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी नवीन वर्ष लकी ठरणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे.
नवीन वर्ष 2024 सिंह राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. खास करुन व्यावसायिकांसाठी नवीन वर्ष प्रगती आणि धनलाभ घेऊन आलं आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. राजकारणी लोकांसाठी 2024 वर्ष सुवर्ण काळ ठरणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा हे तुमची वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांसाठीही नवीन वर्ष 2024 अतिशय चांगल सिद्ध होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)