राशीभविष्य : 'धुलीवंदन'च्या दिवशी असं असेल 12 राशींच भविष्य

असा असेल आजचा दिवस 

Updated: Mar 10, 2020, 07:38 AM IST
राशीभविष्य : 'धुलीवंदन'च्या दिवशी असं असेल 12 राशींच भविष्य  title=

मुंबई : आज धुलीवंदन.... 2020 या वर्षात रंगांची उधळण करण्यासाठी हा सण घेऊन आलाय उत्साह. रंगांच्या उधळणीने आजचा दिवस रंगून जाणार आहे. हेच रंग तुमच्या आयुष्यात देखील सुख, समाधान, शांती आणि ऐश्वर्य घेऊन येणार ठरणार आहे. आजच्या नक्षत्राचा 12 राशींच्या भविष्यावर काय परिणाम होणार हे पाहूया?  

मेष - पैशाच्या बचतीकरता आज नवीन योजना समोर येईल. आज काही निर्णय तुमच्याबाजूने घडू शकते. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळच्या व्यक्तीशी संबंधीत काही नवीन गोष्टी कळतील. कामात नक्की सुधारणा करा. धुलीवंदन आनंद घेऊन येईल. 

वृषभ - पैशांबाबत कोणतेही निर्णय घेताना सावधपणे घ्या. आजचा दिवस तुमचा आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. पार्टनरसोबत चांगला वेळ घालवाल. काहीही नवीन करण्यापूर्वी पार्टनरशी संवाद साधा. आज अर्धवट राहिलेली सर्व काम पूर्ण होतील. 

मिथुन - आज एकाच दिवशी अनेक योजना बनवाल. स्वतःवर संयम ठेवण्याची गरज आहे. कामात नवीन सुरूवात कराल याचा फायदा तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आजचा दिवस तुमचा आहे. आरोग्याची काळजी घ्याल. धुलीवंदन जीवनात रंगांची उधळण करणारी ठरणार आहे. 

कर्क - स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. बिझनेस, पैसे आणि कायद्यात जोडलेल्या गोष्टींमध्ये आजचा दिवस जाईल. नवीन मित्र बनतील ज्यांचा भविष्यात खूप फायदा होईल. अनेक कामात सक्रिय राहाल आणि यशस्वी देखील व्हाल. जुन्या गोष्टी आज फायद्याच्या ठरतील. कुटुंबासोबत आज वेळ घालवाल. 

सिंह - आजचा दिनक्रम लक्षात ठेवून फॉलो करा. दिवस घाईगडबडीचा आहे. त्यामुळे काम विसरण्याची वेळ येईल. एखादं महत्वाचं पद आज तुमच्याकडे येऊ शकतं. कामात आपली छाप सोडाल त्यामुळे यश मिळेल, कौतुक होईल. धुलीवंदन खेळताना सावध राहा. 

कन्या - उदासीनतेमधून आज बाहेर निघण्यास तुम्हाला मदत होईल. आज रंगपंचमी आहे. त्याचा उत्साह तुम्हाला दिवसभर जाणवणार आहे. नवीन मित्रपरिवाराशी जोडले जाल. पुढे जाण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे कुटुंबाकडून चांगलाच पाठिंबा मिळेल. दिवस आज थोडा तणावाचा असला तरीही तुमच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून खास असणार आहे. 

तूळ - नवीन जबाबदारी मिळू शकते. मेहनतीचं फळ आज तुमच्या पदरी पडेल. कामातून समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधू शकता. याचा फायदा नोकरी प्रमोशनकरता तर व्यवसायात नवीन गोष्टी मिळवण्यासाठी होईल. आज कुटुंबाशी संबंधीत नविन निर्णय घेऊ शकता. तो कुणासाठी चांगला तर कुणासाठी थोडा त्रासदायक असेल. 

वृश्चिक - आज सर्वाधिक काम सहज पूर्ण होताना दिसतील. योजना आखूनच काम पूर्ण करावे लागतील. कारण काम जास्त आणि वेळ कमी असं नियोजन करणं अत्यंत महत्वाचं असेल. ज्या खास संधीची वेळ पाहत आहात ती संधी आज मिळू शकते. 

धनू - आज जवळच्या मित्रासोबत कामात पार्टनरशिप कराल. दुसऱ्यांच्या माध्यमातून कामात मदत होईल याचा खूप फायदा होईल. पार्टनरकडून खूप चांगली साथ मिळाल्यामुळे आजचा दिवस उत्तम राहील. यामुळे आजचा दिवस समाधानाचा असेल. 

मकर - अनेक योजना मनात आखत असाल पण आज त्या कृतीतून व्यक्त करण्याचा दिवस आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे दिवस कामाचा, ताण-तणावाचा असेल. अविवाहित असाल तर त्या बाजूने गोष्टी पुढे सरकतील. लग्नबंधनाचा योग आहे. 

कुंभ - आजचा दिवस महत्वाचा आहे. आजच्या दिवसात काही महत्वाचे ठाम निर्णय घ्यावे लागतील. लोकांकडून कामात मदत मिळेल. मित्र परिवाराशी गाठीभेटी होतील त्यामुळे दिवस उत्साहात असेल. पालकांच्या तब्बेतीची काळजी घ्याल. त्यांच्या सोबत आजचा दिवस घालवा. हीच खऱ्या अर्थाने रंगपंचमी असणार आहे.

मीन - आजचा दिवस तुमचा आहे. प्रचंड मेहनत आणि उत्साहाने आजचा दिवस भरलेला आहे. धैर्याने साऱ्या गोष्टी करा. पण कुणाबद्दलही मनात कटूता आणू नको. माणूस कायमच चांगला असतो पण परिस्थिती त्याला तसं वागण्यास भाग पाडत असते. त्यामुळे संयमाने आजचा दिवस घालवा. आजपासून दररोज प्रत्येकाला रंगप्रमाणे आनंद द्यायला शिका.