Hartalika Tritiya Night : आज हरतालिका व्रत महिलांसाठी अतिशय खास आहे. हे व्रत एक वैवाहिक महिला आपल्या नवऱ्याचा प्रगती आणि दीर्घयुष्यासाठी करते. तर कुमारिका आपल्या सर्वगुण संपन्न चांगला नवरा मिळावा म्हणून हे कठीण तप करते. हे असं व्रत आहे जे विधवा महिलाही करु शकतात. माता पार्वती आणि शंकरदेवाला समर्पित हे व्रत अतिशय कठोर आहे. या व्रताचं एकदा संकल्प केल्यास ते आजन्म करावं लागतं. शिवाय हरतालिकेच्या व्रताचा उपवास हा निर्जल असून दुसऱ्या दिवशी सोडला जातो. हरतालिकेचा रात्री महिला जागरण करतात. (Hartalika teej Why do women keep vigil all night on Hartalika Tritiya What is the result of not waking up) हरतालिकेला जागरण का करावे आणि त्याचे काय परिणाम होतात, पाहूया.
या दिवशी भगवान शंकराची आठही प्रहार पूजा करावी असं शास्त्रात सांगण्यात आलंय. दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर आहेत. त्यामुळे रात्रभर जागे राहावे लागते. विशेष पूजा सूर्यास्तानंतर प्रदोष कालापासून सुरू होते आणि सकाळी समाप्त होते. या व्रतामध्ये महिला वेळोवेळी पूजा करतात आणि रात्रभर भजन आणि लोकगीतं गात असतात. या पूजेमध्ये मातीत वाळू मिसळून शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे.
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 04:30 ते 05:16.
सकाळी संध्याकाळ: 04:53 ते 06:02.
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:54 ते दुपारी 12:44 पर्यंत.
विजय मुहूर्त: दुपारी 02:25 ते 03:15 पर्यंत.
संधिप्रकाश मुहूर्त: 06:36 ते 06:59.
संध्याकाळ संध्याकाळ: 06:36 ते 07:45 पर्यंत.
निशिता मुहूर्त: दुपारी 11:56 ते दुपारी 12:42 (7 सप्टेंबर).
रवि योग: दुसऱ्या दिवशी सकाळी 09:25 ते 06:02 पर्यंत.
असंही मानलं जातं की एकदा महिलने हे व्रत पाळायला सुरुवात केली की तिला आयुष्यभर हे व्रत करावं लागतं. या व्रतामध्ये अन्न किंवा पाण्याचे सेवन केलं जात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेनंतर पाणी पिऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे. अशीही एक समजूत आणि प्रचलित समज आहे की जे काही अन्न किंवा इतर कोणत्याही पदार्थाचे सेवन केलं जातं, त्या अन्नाच्या स्वभावानुसार त्याचा पुढील जन्म त्या योनीतच होतो. या दिवशी आठ प्रहार पूजाही केल्या जातात आणि झोपलेल्या स्त्रीला अजगर किंवा मगरीची योनी मिळते असाही समज आजही मानला जातो.
हिंदू सणवाराला जागरणाची जोड दिल्याचा दिसून येतं. जागरण म्हणजे केवळ न झोपणे, असा त्याचा अर्थ नाही, तर जागे होणे हा अर्थ अभिप्रेत आहे. आपल्या कामांप्रती, ध्येयाप्रती, निश्चयाप्रती जागे होणे आणि जागृत राहून काम करणे, ही जाणीव या व्रत वैकल्यांच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था धर्मशास्त्राने केली आहे. असा हा सण, व्रत, परंपरांमध्ये दडलेला सुंदर गर्भितार्थ लक्षात घेतला, तर जुन्या जाणकारांचा आणि आपल्या संस्कृतीचा आपल्यला निश्चित हेवा वाटेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)