Hans Rajyog 2023 : गुरु ग्रह वर्षातून एकदाच राशिचक्र बदलतो. गुरु ग्रह भाग्य, विवाह आणि सुखाचा ग्रह मानला जातो. 2023 मध्ये 22 एप्रिल रोजी बृहस्पति मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल आणि याआधी 1 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी गुरू अस्त करतील. 29 एप्रिल 2023 रोजी बृहस्पति मीन राशीत जातील त्यानंतर मेष राशीत येतील. गुरूचा उदय होताच हंस राज योग तयार होईल. हंस राजयोग काही राशींसाठी खूप शुभ परिणाम देईल. हा राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. चला जाणून घ्या, कोणत्या तीन राशी आहेत भाग्यशाली...
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूचा उदय खूप शुभ राहील. या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये मोठे यश मिळू शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांचा शोध संपुष्टात येऊ शकतो. करिअर संबंधी कोणतीही प्रलंबीत इच्छा पूर्ण होऊ शकते. नशीब त्यांना साथ देईल, त्यांचे परदेशात जाण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
धनु (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांना हंस राजयोगाचा मोठा फायदा होणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. धनु राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती आणि साडेसातीचा काळही संपला असल्याने हा काळ विशेष फलदायी ठरेल. त्यांना नवीन घर किंवा कार खरेदी करण्याचीही शक्यता निर्माणहोऊ शकते.
हेही वाचा : Akshay Kumar वर का आली भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करायची वेळ? जाणून घ्या कारण
मीन (Pisces)
गुरू मीन राशीत जाईल आणि मेष राशीत उदयास येईल. अशाप्रकारे, मीन राशीतून गुरूचे प्रस्थान या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. याच्यामुळे निर्माण होणारा हंस राज योग या लोकांचा आत्मविश्वास वाढवेल आणि फायदेशीर सिद्ध होईल. या लोकांचे त्यांच्या जोडीदारासोबतचे नाते घट्ट राहील. व्यावसायिकांनाही एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)