Guru Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. असंच नुकतंच गुरु ग्रहाने गोचर केलं आहे. 12 वर्षांनंतर देवांचा गुरु मेष राशीत वक्री झाला आहे. 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:58 वाजता गुरू ग्रह मेष राशीमध्ये वक्री झाला आहे. गुरु ग्रहाच्या वक्री चालीचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
बृहस्पति प्रतिगामी झाल्यामुळे अनेक राशींचं नशीब चमकू शकतं. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया गुरुच्या वक्री चालीने कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
गुरूच्या वक्री चालीने या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. त्याचा तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवर जास्त परिणाम होईल. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. यासोबतच कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात. तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
या राशीमध्ये, गुरू बाराव्या घरात वक्री आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना कौटुंबिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. व्यावसायिक जीवनातही काही गडबड होऊ शकते. त्यामुळे थोडं सावध राहावं लागणार आहे. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळावे.
या राशीत गुरु नवव्या घरात वक्री झाला आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात. करिअरमध्येही काही चढ-उतार येऊ शकतात. विनाकारण रागराग करणं टाळा. कारण याचा तुमच्या आयुष्यावर दीर्घकाळ नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )