Gudi Padwa Vastu Tips in Marathi : चैत्र शुक्ल प्रतिपदेला मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. हिंदू नववर्ष हे इतर राज्यामध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेटी चन्ड या नावाने साजरं करण्यात येते. महाराष्ट्रात विजयाची गुढी उभारुन नव्य वर्षाची सुरुवात करण्यात येते. नवीन वर्षाचं स्वागत करताना घरात सुख सृमद्धी नांदावी म्हणून वास्तू शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी घरात आनंद, पैसा आणि समृद्धीसाठी उपाय सांगितले आहेत. (Gudi Padwa Vastu Tips in Marathi Make this change in your home before Gudi Padwa happiness and prosperity in home)
वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी गुढीपाडव्या पूर्वी घराचे स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे. घरात स्वच्छता असेल तर त्या घरात लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. घरातील तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आणि अडचणीचं सामान घराबाहेर काढून टाका. खोलीचे दरवाजे आवाज करत असतील तर ते दुरुस्त करा. कारण हे आवाज म्हणजे नकारात्मक शक्तींचं प्रतीक मानलं जातं.
त्याशिवाय घराच्या प्रवेश द्वारावर स्वस्तिक, शुभ लाभाचे चिन्ह लावा. तूळस खराब झाली असेल नवीन तूळस लावा आणि तिची काळजी घ्या. गुढीपाडव्या पूर्वी घरात मोरपंख नक्की आणा. हे मोरपंख घरातील कुठल्याही खोलीत, मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावावे.
घरात जर साठलेले आणि जुने कपडे असतील तर काढून टाका. फाटलेल्या चप्पला, बूट आणि जुन्या इलेक्ट्रिक खराब झालेल्या वस्तूही काढून टाका. चप्पला हे शनिचं तर इलेक्ट्रॉनिक वस्तू हे राहूचं प्रतिक असतं. त्यामुळे या गोष्टी घरातून काढल्या तर कुंडलीतील राहू आणि शनि चांगल्या स्थितीत येतात.
त्याशिवाय स्वयंपाकघराची स्वच्छता नक्की करा. खराब झालेले कडधान्य, पिठ स्वच्छ करा. कारण यामुळे तुम्ही अलक्ष्मीला निमंत्रण देतो आहोत. स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर काढा. फ्रिजची स्वच्छता करा. तसंच पक्ष्यांना दररोज कडधान्य आणि पाणी नक्की ठेवा. त्यामुळे कुंडलीतील बुध मजबूत स्थितीत येतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)