'हा' आहे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त

हिंदू पंचागानुसार साजरा केला जाणारा आणि मराठी नववर्षारंभ म्हणून महत्त्वाचा असलेला दिवस म्हणजे गुढीपाडवा.

Dakshata Thasale Updated: Mar 16, 2018, 01:00 PM IST
'हा' आहे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त  title=

मुंबई : हिंदू पंचागानुसार साजरा केला जाणारा आणि मराठी नववर्षारंभ म्हणून महत्त्वाचा असलेला दिवस म्हणजे गुढीपाडवा.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे  महाराष्ट्रासह जगभरात या दिवसाला मोठे महत्त्व. यंदाच्या वर्षी या सणाचे वैशिष्ट्य असे की, एरवी एक दिवसाचा असणारा हा सण यंदा दोण दिवसांचा असणार आहे. त्यामुळे जाणून घ्या गुढीपाडवा शुभमुहूर्त आणि इतर माहिती.

यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याचा सण 18 मार्चला रविवार आहे. या दिवशी सकाळी 6 वाजुन 45 मिनिटांनी गुढी उभारण्याचा शुभकाळ आहे. नेहमी चैत्र शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा होतो म्हणून त्याला गुढीपाडवा असे म्हटले जाते. पंचागातही या दिवसाला विशेष स्थान आहे. महाराष्ट्रात हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरी गुढी उभारुन गोडाचं जेवण करण्याची परंपरा आहे. 

गुढीपाडव्याला काय करतात 

गुढीपाडव्याला तेलाने स्नान करुन कडूलिंबाचे पान खाण्याची प्रथा आहे. 'साडे तीन मुहुर्तांपैकी' एक असणारा हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी कोणत्याही वेळी शुभकार्य करणे चांगले असते. 

जाणून घेऊया या सणाच्या महत्वाबद्दल….! 

हिंदू कॅलेंडरप्रमाणे हा दिवस वर्षातील पहिला दिवस मानला जातो. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो. (हे पण वाचा: गुढी पाडव्याच्या अनोख्या शुभेच्छा साजरा करा नववर्ष दिन !!)

ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते. राम अयोध्येला परत आला. रामाने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.

ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. परंपरा जुनी म्हणजे किती तर असं सांगतात की त्या ब्रह्मदेवानं जेव्हा ही सकल सृष्टी निर्माण केली. प्रभू रमचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस. त्या दिवशी सकल अयोध्या वासियांनी गुढ्या तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस.