Gemini Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे मिथुन राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय.
टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगिलं आहे की, एप्रिल महिन्यात हा मिथुन राशीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवणार आहे. तुमच्या आयुष्यातील कुठल्यातरी गोष्टी संपुष्टात येणार आहे. अशी गोष्ट ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही त्रस्त आहात किंवा समस्यासोबत लढत आहात. त्यानंतर तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे.
व्यक्तिक तुम्हाला कुठल्या तरी महत्त्वाचा पूर्ण घ्यावा लागणार आहे. कोणाच्या तरी बोलण्यामुळे तुमचं मन दुखवलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही मनाला लावून घ्याल त्यामुळे तुम्ही स्वत:ला त्रास करुन घेणार आहात. पण तुम्ही ती गोष्ट विसरुन पुढे जा. कुठल्याही निर्णय घेतना विचारपूर्वक घ्या आणि घाई करु नका. प्रियजनांचा तुम्हाला या महिन्यात पूर्ण सहकार्य मिळणार आहे. मात्र तुम्ही त्यांच्यापासून थोड तुटक वागणार आहात.
करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या कार्यक्षेत्रात संधी मिळणार आहे. नोकरी बदल होऊ शकतो. कामं होणार आहेत पण तुम्ही रोजच्या परिस्थितीमुळे जरा त्रस्त असणार आहात. जर तुमच्या स्वत:चा व्यवसाय असेल तर कुठल्याही प्रकारचा धोका पत्करु नका. विचारपूर्व काम करा आणि स्वत:वर नियंत्रण ठेवून पुढे चला. तुम्ही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात थांबा.
आर्थिकदृष्ट्या या महिन्यात तुम्ही स्थिर असाल आणि बचत करण्यात समक्ष असाल. एवढंच नाही तर तुम्हाला पैसाही मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या महिन्यात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करु नका.
आरोग्याबद्दल एप्रिल महिन्यात सतर्क राहण्याची गरज आहे. मानसिक आणि शारीरिक दोन्हीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे.
रुटीनमध्ये या आणि तुमच्या लाइफस्टाइलवर लक्षकेंद्रीत करा. जीम, योगा, प्राणायाम करा. या महिन्यात तुम्हाला खूप जास्त फोकस राहण्याची गरज आहे. प्लनिंगसोबत पुढे जा. आव्हान येणार आहेत पण धोका पत्करु नका. एप्रिल महिन्यातील कुठल्याही शनिवारी पाणी आणि औषधं दान करा. गरजू लोकांना मदत करा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)