मुंबई : व्यक्तीच्या आयुष्यात मृत्यू हे अंतिम सत्य मानलं जातं. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे. परंतु एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा कुठे जाते असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. हिंदू धर्मग्रंथ गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने देखील सांगितले आहे की, आत्मा कधीही मरत नाही.
कोणाचा जन्म झाला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मेला आहे त्याचाही पुनर्जन्म निश्चित आहे. आयुष्यात चांगलं कर्म करणारेच या जीवन-मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतात आणि परलोकात जातात. आत्मासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरं गरुड पुराणात सापडतात. आज जाणून घेऊया गरुड पुराणात काय सांगितलं आहे.
मृत्यूच्या 24 तासानंतर व्यक्तीचा आत्मा 13 दिवस प्रियजनांमध्ये राहतो. 13 दिवस चालणारे विधी पूर्ण झाल्यावर आत्मा पुन्हा यमलोकात परततो. ज्या ठिकाणी त्याला त्याच्या कर्माचे भोग भोगावे लागतात. कर्मानुसारच आत्म्याची पुढची दिशा ठरते.
या 13 दिवस मयतच्या नातेवाईकांकडून विविध विधी पूर्ण करत मयताच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी प्रार्थना करतात. यावेळी, अंत्यसंस्कारानंतर पुढील 13 दिवसांत अस्तिविसर्जन, दशक्रिया, गंधामुक्ती, पिंडदान इत्यादी विधी पार पाडतात.
गरुड पुराणानुसार, अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये. कारण मृत व्यक्तीचा आत्मा तिथे उपस्थित असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे पाहत असतो आणि मोहामुळे त्याला त्यांच्यासोबत परत यायचे असते. त्यामुळेच अनेकदा असं म्हटलं जाते की, अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये, त्यामुळे त्या आत्म्याला मोहातून बाहेर पडण्यास मदत होते.
मृत्यूनंतर आत्म्याशी कसं वागावं याचं वर्णनही गरुड पुराणात करण्यात आलंय. आत्मा शरीर सोडताच चोवीस तास नपुंसकांसोबत राहतो. दरम्यान, आत्म्याने सोडलेलं शरीर पाच तत्वांमध्ये विलीन करण्याचं काम केलं जातं
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)