Ganpati Visarjan 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख

Ganpati Visarjan 2023 : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला दीड दिवसांचा बाप्पा आज आपला निरोप घेणार आहे. मुंबई पालिकेसोबतच पोलीसही बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Sep 20, 2023, 09:15 AM IST
Ganpati Visarjan 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख title=
ganesh chaturthi 2023 ganpati visarjan bmc mumbai traffic police all set navimumbai ganeshotsav

Ganpati Visarjan 2023 : घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात येणार आहे. साधारणपणे सायंकाळी चार नंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगण घराबाहेर पडणार आहेत. या दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यास मुंबई महापालिकासह मुंबई पोली, स्वयंसेवी संस्था सज्ज झाल्या आहेत.  (ganesh chaturthi 2023 ganpati visarjan bmc mumbai traffic police all set navimumbai ganeshotsav)

कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबईतल्या ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. वरळीतील जांबोरी मैदानमध्ये मुंबई महानगरपालिका आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्यावतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी दोन कृत्रिम तलाव हे शाडूच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 

समुद्र किनाऱ्यावर विशेष व्यवस्था 

मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम,  जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तसंच जीव रक्षक ही तैनात करण्यात आले आहेत. यंदा दीड दिवसांच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. 

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी नवी मुंबई सज्ज!

दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 842 सार्वजनिक आणि 90320 खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यात दीड दिवसाचे 49 सार्वजनिक, तर 21484 गणपतीचं आज विसर्जन होणार आहे.  आहेत. हा सोहळा निर्विघ्न पार पडावा म्हणून मुंबई पोलीस सज्ज आहेत. 

'या' घाटांवर विसर्जनाची व्यवस्था

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परिमंडळ-1 मध्ये वाशी-जागृतेश्वर मंदिर, कोपरखैरणे खाडी, तुर्भे, नेरूळ-चिंचवली, करावे गाव, दारावे गाव, सीबीडी-आग्रोळी, ऐरोली नाका, रबाळे-ऐरोली सेक्टर-20 खाडी, दिघा तर परिमंडळ-2 मध्ये कळंबोली-रोडपाली, खारघर-स्पॅगेटी, पनवेल-वडघरखाडी पनवेल, उरण विमला तलाव अशा एकूण 16 ठिकाणांवर गणेशमूर्तींचे विसर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे.