शुक्रवारी गणपतीसाठी चतुर्थी व्रत : बाप्पाला मोदक, दुर्वा करा अर्पण; शिवलिंगाला करावा दुधाने अभिषेक

गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी.

सुरभि जगदीश | Updated: Aug 4, 2023, 05:40 AM IST
शुक्रवारी गणपतीसाठी चतुर्थी व्रत : बाप्पाला मोदक, दुर्वा करा अर्पण; शिवलिंगाला करावा दुधाने अभिषेक title=

शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी सावन अधिकारमास कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला गणपतीसाठी अनेकजण उपवास करतात. गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी.

ज्योतिषी पंडीतांच्या मते, गणेशजींच्या पूजेत दुर्वा विशेष अर्पण करावी. गणेशजींना दुर्वा अतिशय प्रिय आहे. अशावेळी जर तुम्हाकडे पुजा करण्याचं सामान उपलब्ध नसेल तर तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता.

गणपतीला काय अर्पण करणं शुभ मानलं जातं?

दुर्वांसोबत गणपती बाप्पाला मोदक, लाडू आणि जनेयूही अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. अशी धारणा आहे की, देवी पार्वती गणेशाला लाडू आणि मोदक खाण्यासाठी दिले जायते. तेव्हापासून गणेशाला नैवेद्य म्हणून लाडू आणि मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे. 

एका महिन्यात दोन वेळा आहे चतुर्थी

हिंदु पंचांगानुसार, महिन्यात दोन पक्ष असतात. यामध्ये पहिला शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या दिवसांमध्ये पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पासाठी उपवास केला जातो. पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. 

अधिक महिन्यांच्या गणेश चतुर्थीचं महत्त्व अधिक आहे. लोक परंपरेनुसार या व्रतामध्ये दिवसभर उपवास करावा लागतो. यावेळी आकाशात चंद्र पाहिल्यानंतर पूजा करून उपवास सोडला जातो.

सावन, अधिक मास, शुक्रवार आणि चतुर्थीचा योग

4 ऑगस्ट रोजी सावन, अधिक मास, शुक्रवार आणि चतुर्थी यांचा संयोग आहे. या योगामध्ये गणेशासोबत शिव, विष्णू-लक्ष्मी आणि शुक्र यांची विशेष पूजा करावी. शुक्र ग्रहासाठी दुध दान करावं. यावेळी तुम्ही शिवलिंगाचा दुधाने अभिषेक घाला. त्याचप्रमाणे केशरमिश्रित दुधाने विष्णू-लक्ष्मीचा अभिषेक करावा.

व्रतासह या गोष्टींचे दान करा

चतुर्थी व्रताला अन्नधान्य, पैसे, जोडे आणि चप्पल दान करा. मंदिरात पूजा साहित्य अर्पण करावं. तर गाईंना पैसे आणि गवत दान करा.