Surya Gochar 2023: सूर्यदेव करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींवर घोंगावणार संकटांचे ढग

Surya Gochar 2023 : सूर्यदेव मात्र प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सूर्यदेव त्यांच्या राशीमध्ये बदल करत आहेत. सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01:23 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 3, 2023, 10:54 AM IST
Surya Gochar 2023: सूर्यदेव करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींवर घोंगावणार संकटांचे ढग title=

Surya Gochar 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशीबदल करतो. यावेळी सूर्यदेव मात्र प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांना एका राशीत परत येण्यासाठी पूर्ण वर्षाचा कालावधी लागतो. सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. 

ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सूर्यदेव त्यांच्या राशीमध्ये बदल करत आहेत. सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01:23 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत प्रवेश केल्याने याचा अनेक राशींना फायदा होणार आहे. मात्र दुसरीकडे यावेळी काही राशींच्या व्यक्तींचा कठीण काळ सुरु होणार आहे. जाणून घेऊया. कोणत्या राशींना सूर्याच्या गोचरमुळे त्रास होणार आहे. 

कन्या रास 

17 ऑगस्टला होणारं सूर्याचं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशीतआरोग्याची अधिक काळजी घ्या. यासोबतच अधिक खर्च होऊ शकतो. म्हणूनच थोडे सावध राहणे योग्य ठरणार आहे. मोठी आर्थिक जोखीम घेणे किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. 

वृश्चिक रास

या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचं गोचर धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे बोलणे किंवा टीका करणे टाळावं. खूप व्यस्त असल्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही थोडे तणावात राहू शकता. जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. आर्थिक नुकसानासह कौटुंबिक कलह होऊ शकतो. पत्नीशी वाद होण्याची शक्यता आहे.

मकर रास

सूर्याच्या गोचरमुळे या राशीच्या व्यक्तींना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचसोबत मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवास करताना थोडे सावध राहा, कारण तुम्हाला अपघात होऊ शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )