Sawan Somwar 2023 : निज श्रावणाचा पहिला सोमवारी महादेव, चंद्राची अपार कृपा! 5 राशींना धनलाभ

First Shravan Somvar 2023 : निज श्रावणाचा आज पहिला श्रावण सोमवार असून आज अद्भूत असा योग जुळून आला आहे. आज श्रावण सोमवारसोबत नागपंचमी आहे. आज महादेव आणि चंद्राची अपार कृपा 5 राशींच्या लोकांवर बरसणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 21, 2023, 09:35 AM IST
Sawan Somwar 2023 : निज श्रावणाचा पहिला सोमवारी महादेव, चंद्राची अपार कृपा! 5 राशींना धनलाभ title=
first shravan somvar 21 august 2023 shubh yog puja vidhi proper method of flowing shivamuth nag panchami 2023 these 5 zodiac signs get money

First Shravan Somvar 2023 : चातुर्मासातील श्रावण महिना यंदा अधिक आला असल्याने सगळे सणावर पुढे ढकल्या गेले आहेत. अधिक मासाची सांगता झाल्यानंतर निज श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज निज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते. श्रावण महिना शंकराला अधिक प्रिय असतो असं म्हणतात. श्रावण म्हणजे निसर्गाची आणि नाविन्याची चाहूल असं म्हणतात. (Sawan Somwar 2023 Shivamuth)

शिवामूठाचं महत्त्व आणि योग पद्धत!

श्रावण सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. त्याशिवाय महाराष्ट्रात भोलेनाथाची पूजा केल्यानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. असं म्हणतात की श्रावणात वसा म्हणजे शिवामूठ केल्यास सासुरवाशीण आपल्या सासरी आवडती होते. शिवामूठ करताना माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा, दिरा भावा नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा. (first shravan somvar 21 august 2023 shubh yog puja vidhi proper method of flowing shivamuth nag panchami 2023 these 5 zodiac signs get money)

शिवामूठ 

पहिला श्रावण सोमवार - 21 ऑगस्ट तांदूळ 
दुसरा श्रावण सोमवार  - 28 ऑगस्ट तीळ 
तिसरा श्रावण सोमवार - 04 सप्टेंबर मूग 
चौथ्या श्रावण सोमवार - 11 सप्टेंबर जव 

'या' राशींवर महादेव, चंद्राची अपार कृपा!

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी अतिशय शुभ ठरणार आहे. घरात आनंदी आणि धार्मिक वातावरण असणार आहे. भौतिक सुखांच्या वस्तूंची खरेदी होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात. कुंडलीतील चंद्र मजबूत स्थितीत असल्याने तुम्हाला फायदा होईल. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी यश घेऊन आला आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. जुन्या मित्राची भेट होणार आहे. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. व्यावसायात प्रगती आणि यश प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होणार आहे. 

कन्या (Virgo)

पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. जवळच्या व्यक्तीसोबत वादावादी होण्याची भीती आहे. बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. लव्ह लाइफमध्ये आनंदाची बातमी मिळणार आहे. 

धनु (Sagittarius)

पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. भौतिक सुखांचा ओघ वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. चांगली बातमी मिळणार आहे. व्यवसायात प्रगती होणार आहे. 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी फलदायी ठरणार आहे. नोकरदार वर्गाला नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रुचू वाढणार आहे. पैशाची बचत करुन गुंतवणूक करणार आहात. आयुष्यातील संकट आणि अडथळे दूर होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)