Mother Father Crying In Dreams: असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात. पण अनेकदा आपण जी स्वप्न पाहतो ती सकाळी उठल्यावर विसरुन जातो. खरं तर प्रत्येक स्वप्नांचा एक अर्थ असतो. जो तुम्हाला शुभ आणि अशुभ संकेत देत असतो, असं म्हणतात. हिंदू धर्मात स्वप्नशास्त्राला खूप महत्त्व आहे. स्वप्नांवरुन अनेक संकेतांचे अर्थ काढले जाऊ शकतात. काही स्वप्ने आपल्याला भविष्यासंदर्भातील इशारे देतात. स्वप्नशास्त्रात स्वप्नाचा अर्थांचा उल्लेख करण्यात आला आहे. जर तुम्ही स्वप्नात तुमच्या आई-वडिलांना पाहिलं तर त्याचे काय काय अर्थ असू शकतात, जाणून घ्या.
स्वप्नामध्ये आई-वडिलांना पाहणं हा शुभ संकेत आहे. स्वप्नशास्त्रानुसार त्याचा अर्थ तुमचे आयुष्यात संपत्ती आणि समाधानी असणार आहे. भविष्यात यशाच्या अनेक संधी येतील. समाजा आणि कुटुंबात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. देवाचीदेखील कृपादृष्टी राहिल.
आई-वडिलांना स्वप्नात रडताना पाहणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की ते तुमच्या एखादा कामावरुन दुखी आहेत. तुम्हाला मानसिक आणि शारिरीक रित्या त्रास होऊ शकतो. इतकंच नव्हे तर आयुष्यात एखादं संकट येऊ शकते, असा इशाराही देण्यात येतो. आई-वडिलांना देवाचा दर्जा मिळाला आहे. स्वप्नात आई-वडिलांना रडताना पाहून देवाला नाराज करण्यासारखे आहे. तसंच, आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ते स्वप्नात येत असतील तर समजून जा की त्यांची एखादी इच्छा अधुरी राहिली आहे. किंवा त्यांच्या आत्मा संतुष्ट झाला नाही, असं सांगितलं जातं. अशात पूर्वजांचे श्राद्धकार्य करुन घ्या.
असं म्हणतात की, स्वप्नं हे संकेत असतात आणि कोणत्या तरी घटनेबाबत किंवा भविष्याबाबत आपल्याला सावध करत असतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा विचार केला तर स्वप्नांत अंतर्मनात दडलेले विचार, इच्छा, भीती आणि इतर भावनांशी जोडलेले आहे. विज्ञानानुसार, स्वप्न तेच दाखवतात जे आपल्या अंतर्मनात लपलेले असते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )