Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. नीतिशास्त्रात सांगतिलेल्या धोरणांचा अवलंब केला, तर जीवनात अडचणी येत नाहीत. त्यामुळे नीतिशास्त्राबाबत लोकांना कायमच उत्सुकता राहिलेली आहे. नीतिशास्त्राप्रमाणे वागण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. आचार्य चाणक्य यांनी स्त्री पुरुषांबाबत काही बाबी सांगितल्या आहेत. जसं की स्त्री पुरुषांनी आपलं गुपित कधीच कुणासमोर सांगू नये अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकतो. चला जाणून या कोणत्या गोष्टी आहेत.
चारित्र्य- आचार्य चाणक्य यांच्यानुसार विवाहानंतर स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांच्या उणीवा झाकल्या पाहिजेत. घरामध्ये काही भांडण असल्यास आपापसात सोडवावे. स्त्री किंवा पुरुष आपल्या घरातील गोष्टींबद्दल किंवा एकमेकांच्या चारित्र्याबद्दल बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सांगत असेल. तर वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते. कारण सदर व्यक्ती या गुपिताचा फायदा घेईल आणि वेळ आल्यावर चेष्टा करण्यास मागे पुढे पाहाणार नाही.
आर्थिक नुकसान- आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुमचे नुकसान झालं असेल तर ते कधीही व्यक्त करू नका. कारण इतर लोक नुकसानीबाबत दु:ख व्यक्त करतील पण प्रत्यक्षात आनंदी असतील. तसेच तुमच्या मागे निंदा करतील. समाजात मानसन्मान टिकवण्यासाठी पैशाचे नुकसान झाल्याचं कोणालाही सांगू नका. अन्यथा लोकं तुमच्यापासून दूर जातील.
बदनामी- आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, जर कोणी तुमचा अपमान केला किंवा तुम्हाला दुखावलं असेल तर हे कोणालाही सांगू नका. कारण ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगणार आहात ती तुमच्याबद्दल वेगळा विचार करू शकते. म्हणून अपमानाबद्दल कोणालाही सांगू नका, मग ते पती किंवा पत्नी असले तरीही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)