Surya Gochar In Makar Rashi 2023: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. 9 ग्रह, 12 राशी आणि गोचर कालावधी यामुळे जातकांवर परिणाम दिसून येतो. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि गोचर ग्रह यामुळे प्रभाव दिसून येतो. त्या त्या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील ग्रहमान आणि गोचर ग्रह यावरून फळ मिळतं. गोचर कुंडलीत सर्वसमावेश विचार केला जातो. आता 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नवं वर्ष 2023 चे वेध सर्वांना लागले आहेत. नव वर्षात अनेक ग्रह आपली रास बदलणार आहेत. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात सूर्य आणि शनिदेव राशी बदल करणार आहेत. 14 जानेवारीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश (Surya Grah Gochar) करणार आहे. संक्रमणाला मकर संक्रांती (Makar Sankranti) असं म्हंटलं जातं. सूर्यदेवांच्या (Surya Dev) या गोचराचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. पण काही राशींना या गोचराचा शुभ परिणाम मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहेत.
मेष (Mesh)- सूर्यदेवांना धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करताच मेष राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. विवाहासाठी हा काळ उत्तम असणार आहे. तसेच उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित फळ मिळेल. कुटुंबाचं प्रत्येक कामात सहकार्य मिळेल.
कन्या (Kanya)- सूर्यदेवांचा सकारात्मक परिणाम या राशीच्या लोकांवर दिसून येईल. खासगी कंपनीत काम करणाऱ्या लोकांना या काळात फायदा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यापारातही चांगले परिणाम दिसून येतील.
बातमी वाचा- ...नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच
वृश्चिक (Vrushchik)- या राशीच्या लोकांना सूर्यदेवांचं पाठबळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुकाची छाप पडेल. अधिकारी आणि सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. पदोन्नती आणि पगार वाढण्याचे संकेत आहेत. शासकीय कामातही फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे.
मीन (Meen)- या राशीचा स्वामी गुरु असून सध्या याच राशीत मार्गस्थ आहे. त्यात गुरुसोबत सूर्याचं पाठबळ मिळणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना कामात यश मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना अपेक्षित फळ मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)