Astrology tips: आजकाल आपण सारेच पैसे कमवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतो. आपलं कुटुंब सुखी राहावं त्यांना सर्व गोष्टी वेळच्या वेळी मिळाव्यात म्हणून आपण कष्ट करून पैसे कमवतो.
रोजच्या धावपळीत आपण रोज लागणारे पैसे , डेबिट कार्ड्स, ट्रेनचा पास, आपला डब्बा सगळ्या महत्वाच्या वस्तू पर्समध्ये ठेवतो आणि प्रवास करतो. आपली बॅग किंवा पर्स रोजयच्या जगण्याच्या धावपळीतला महत्वाचा हिस्सा आहे.
आपण सगळेच जण आपली पर्स जुनी झाली किंवा फाटली की लगेच बदलून ती टाकून देतो. पण असं करण्याने आपल्याला काहीवेळा नुकसानही होऊ शकतं. काहीवेळा आपण जुनी पर्स किंवा पाकीट तसंच रिकामं ठेवून देतो. ते देखील चांगलं नाही. पण जुन्या पर्ससारखे नव्या पाकिटातही पैसे टिकवण्यासाठी आणि आर्थिक भरभराट होण्यासाठी जुनं पाकिट आपल्याला मदत करू शकतं.
आपल्याकडील जुनी पर्स किंवा पाकीट टाकून देऊ नका. त्याला वेगळ्या पद्धतीनं वापरा त्यामुळे तुमच्या नव्या पाकिटातील पैसे टिकून राहातील. तुमची आर्थिक भरभराट (how to get money) होईल. आज आपण जाणून घेऊया जुन्या पर्सचं नक्की करायचं काय?
जुन्या झालेल्या पाकिटात किंवा पर्समध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवा. तो लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा. (astrology tips ) असं केल्याने तुमच्याकडे पैशांची चणचण भासत नाही. तुमची नवीन पर्स रिकामी राहणार नाही. आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत.
जुन्या किंवा फाटलेल्या पर्सला टाकून न देता त्यामध्ये तांदळाचे दाणे ठेवावेत. जेव्हा तुम्ही नवीन पर्स वापरायला काढाल तेव्हा हे तांदळाचे दाणे जुन्या पाकिटातून काढून नव्या पाकिटात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे धन राहिल. पैसा पाण्यासारखा खर्च होणार नाही. सकारात्मक ऊर्जा राहिल.
जुनी किंवा फाटलेली पर्स जवळ बाळगण्याआधी ती नीट करा. फाटकी पर्स वापरल्याने नकारात्मक ऊर्जा (negative energy) निर्माण होते. आर्थिक अडचणी ओढवतात. या पर्सला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे नकारात्मकता दूर होते. मात्र ही पर्स अशी ठेवण्याआधी त्यामध्ये नाणं किंवा तांदळाचे दाणे आवर्जून ठेवावेत.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे )