तुळशीच्या संदर्भातील 'ही' चूक तुम्हाला करु शकते कंगाल, घरावर दुःख आणि नकारात्मकतेचं सावट

Tulsi Vastu Tips:  तुळशीचं रोप हे लक्ष्मीचे रुप म्हणून ओळखले जाते. तुळशीच्या पानाचा अपमान करणे किंवा चुकून या संदर्भातील कोणतीही गोष्ट करणे घरात दुःख घेऊन येईल. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 7, 2023, 01:02 PM IST
तुळशीच्या संदर्भातील 'ही' चूक तुम्हाला करु शकते कंगाल, घरावर दुःख आणि नकारात्मकतेचं सावट title=

Tulsi Plant Rules in Marathi : वास्तुशास्त्रात घरातील महत्त्वाच्या गोष्टींसाठी नियम दिलेले आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील लोक आनंदाने आणि प्रेमाने एकत्र राहतात. अशा घरावर लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद देत असते. ज्या घरामध्ये रोज तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि ज्या घरात तुळशीच्या रोपाचा मान ठेवला जातो, तिथे नेहमी सुख-समृद्धी राहते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपाशी संबंधित चुका व्यक्तीला गरीब, कंगाल बनवतात. अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. घरात दु:ख, समस्या आहेत. आज आपण जाणून घेऊया तुळशीच्या रोपाशी संबंधित कोणत्या चुका कधीही करू नयेत.

तुळशीसंदर्भातील 'या' चूका टाळा 

- वास्तुशास्त्रानुसार घरातील तुळशीचे रोप नेहमी हिरवे असावे. हिरव्या तुळशीच्या रोपामुळे घरात सुख-समृद्धी येते.

- तुळशीचे रोप कधीही सुकू नये. तुळशीचे रोप वाळवणे शुभ मानले जात नाही. वाळलेल्या तुळशीचे रोप घरामध्ये दारिद्र्य, दुःख आणि दुर्दैव आणते. अनेक वेळा तुळशीचे रोप थंडीच्या वातावरणात सुकते, परंतु पुरेशी देखभाल करूनही तुळशीचे रोप पुन्हा पुन्हा सुकले किंवा विनाकारण सुकले तर ते मोठ्या आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे.

- तुळशीचे रोप सुकले तर नदी किंवा जलाशयात टाकून त्या जागी नवीन रोप लावा. पण वाळलेल्या रोपाला कचरा किंवा अपवित्र ठिकाणी टाकू नका.

- तुळशीच्या रोपाभोवती नेहमी स्वच्छता ठेवा. तुळशीच्या रोपाजवळ घाण, कचरा, झाडू किंवा जोडे ठेवणे फारच अशुभ आहे. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि घरामध्ये गरिबी येण्यास वेळ लागत नाही.

- तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरडे किंवा अशुद्ध हातांनी स्पर्श करू नका. शूज किंवा चप्पल घालून तुळशीला हात लावू नका किंवा त्यात पाणी टाकू नका.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)