Astrology Tips: आपल्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत म्हणून आपण नेहमी प्रयत्न करत असतो. काही वेळेला काही सवयी,गोष्टी बदलून पाहिलं तर सकारात्मक परिणाम दिसू लागतो. वास्तूमध्ये आनंद आणि शांती हवी असेल तर वास्तुशास्त्रात काही बदल सांगितले आहेत काही लोकं वास्तुशास्त्राला खूप मानतात. कारण त्याचा आपल्या जीवनात खूप प्रभाव पडतो. यातील काही गोष्टींचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो, तर काही गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे सहसा लोकं घर घेताना किंवा कोणतीही नवीन गोष्ट घरी आणताना त्याचा विचार करतो. वस्तूंबरोबरच माणसांच्या वागण्या बोलण्यात देखील वास्तुशास्त्रामुळे फरक पडतो.
रात्री झोपताना आपण अनेकदा काही गोष्टी डोक्याजवळ ठेवून झोपतो. त्यापैकी मोबाईल फोन हा सगळ्यात पहिल्यानंबरवरती येतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की वास्तुशास्त्रानुसार रात्री काही गोष्टी डोक्याजवळ ठेवून झोपणे चुकीचे मानले जाते. कारण असे केल्याने आपल्याला आयुष्यात अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या कधीही डोक्याजवळ ठेवल्या जाऊ नयेत हे जाणून घेऊया.
या गोष्टी डोक्याजवळ ठेवू नका
इलेक्ट्रॉनिक गोष्टी : मोबाईल फोन, घड्याळ, लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी कधीही डोक्याजवळ ठेवू नयेत. या गोष्टी कधीही फुटू शकतात. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींचा जीवनात नकारात्मक परिणाम होतो.
पुस्तके : पुस्तके, वर्तमानपत्रे किंवा कॉपी-रजिस्टर, फाईल सारख्या गोष्टी देखील झोपायला डोक्याजवळ ठेवू नयेत. वास्तुनुसार या सर्व गोष्टींचा व्यक्तीच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो.
पर्स : डोक्याजवळ पर्स ठेवून झोपणे चांगले नाही. बरेच लोकं डोक्याखाली पर्स घेऊन झोपतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने जीवनात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त, नातेसंबंध देखील खराब होऊ शकतात.
पाणी : बरेच लोकं झोपताना डोक्याजवळ पाण्याची बाटली घेऊन झोपतात. वास्तुनुसार असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा परिणाम कुंडलीतील चंद्रावर होतो. यामुळे मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.
आरसा : डोक्याजवळ आरसा ठेवणे टाळा. तसेच वास्तुनुसार, झोपताना आपली सावली आरशात दिसू नये. यामुळे भीतीदायक स्वप्ने रात्री येतात आणि वैवाहिक जीवनातही समस्या येऊ शकतात.
औषधे : वास्तुशास्त्रानुसार रात्री कधीही डोक्याखाली औषध घेऊन झोपू नये. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी आजारी असाल, तर झोपण्यापूर्वी त्याला औषध द्या आणि रात्री औषध त्याच्यापासून थोडे दूर ठेवा.