धनत्रयोदशी २०१७ : धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त

दिवाळीची सुरूवात धनत्रयोदशीच्या दिवशी होते. या दिवसापासून पुढील ५ दिवस दिवाळी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भांडी, वस्तू, सोनं-चांदी खरेदी करतात.

Updated: Oct 16, 2017, 01:51 PM IST
धनत्रयोदशी २०१७ : धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त title=

नवी दिल्ली : दिवाळीची सुरूवात धनत्रयोदशीच्या दिवशी होते. या दिवसापासून पुढील ५ दिवस दिवाळी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भांडी, वस्तू, सोनं-चांदी खरेदी करतात.

या दिवशी या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी या वस्तू खरेदी केल्यास आणि पूजा केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. धनत्रयोदशीला केवळ लक्ष्मीसाठीच नाहीतर कुबेरासाठीही केली जाते. कुबेर हा धनाचा देव मानला जातो. अनेक लोक या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराची एकत्र पूजा करतात. या दिवशी प्रार्थना केल्यास धनलाभ होतो, असे मानले जाते. 

शुभ मुहूर्त -

धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त -
सायंकाळी ७.३० वाजेपासून ते ८.१८ वाजेपर्यंत असेल. १७ ऑक्टोबरला त्रयोदशी तिथी सकाळी १२ वाजून २६ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी १८ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेपर्यंत असेल.