धनत्रयोदशी २०१७: या वस्तूंची खरेदी करणे होईल लाभदायक

धनत्रयोदशी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. उद्या म्हणजेच १७ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीतील पाच महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण काय खरेदी करावे याचा विचार करणेही गरजेचे आहे. जाणून घेऊया अशा काही वस्तू ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल.  

Updated: Oct 16, 2017, 03:56 PM IST
धनत्रयोदशी २०१७: या वस्तूंची खरेदी करणे होईल लाभदायक title=

नवी दिल्ली : धनत्रयोदशी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. उद्या म्हणजेच १७ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीतील पाच महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण काय खरेदी करावे याचा विचार करणेही गरजेचे आहे. जाणून घेऊया अशा काही वस्तू ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल.  

असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी समुद्र मंथना दरम्यान अमॄत घेऊन प्रकट झाले होते. या दिवशी पितळ खरेदी करणे शुभ मानले जाते. पितळ हे भगवान धन्वंतरीचा धातू मानलं जातं. पितळ खरेदी केल्याने घरात आरोग्य, सौभाग्य आणि सुख नांदतं. 

धनत्रयोदधीच्या दिवशी चांदी खरेदी करणेही शुभ मानलं जातं. घरात धन आणि समृद्धीही वाढते. या दिवशी घरात धातूच्या वस्तू आणल्यास बिझनेसमध्येही फायदा होतो. याच दिवशी भगवान गणेशाची आणि देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणेही शुभ मानलं जातं. असे केल्यास घरातील आर्थिक संकट दूर होतं, असं मानलं जातं. 

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेराच्या पूजेलाही मोठं महत्व आहे. या दिवशी कुबेराचा फोटो विकत आणा. तो उत्तर दिशेला स्थापित करा. असे केल्याने धनलाभ होऊ शकतो. तसेच या दिवशी शंख खरेदी करणेही शुभ मानले जाते.