मुंबई : सणासुदीला सोने खरेदी करणं ही भारतीय परंपरा. दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा धनत्रयोदशीला सोने खरेदी केले जाते. त्यासोबतच साडे तीन मुहूर्तांमध्ये भारतात सर्रास सोने खरेदी केली जाते. पण दिवाळीत हा ओघ अधिक असतो.
मात्र याच उत्सवांच्या दिवसांमध्ये सोने खरेदी करताना अनेकदा फसवणूक होण्याचीही शक्यता असते. अशावेळी सोने खरेदी करताना काळजी घेणे तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे सोने खरेदी करताना हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा.
सोने खरेदी करताना पहिल्यांना सावध असले पाहिजे. तसेच सोने खरेदी करताना प्रथम बीआयएस हॉलमार्क पाहिला पाहिजे. हॉलमार्कद्वारे खरे सोने ओळखण्यास मदत होते. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचा त्रिकोणी निशान असतं. आणि त्याच्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धता लिहिलेली असते.
सोने खरे आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी अॅसिड टेस्ट करणे अधिक फायद्याचे आहे. तुम्ही एखाद्या पिनच्या सहाय्याने सोन्यावर ओरखडा ओढा. त्यानंतर नायट्रिक अॅसिडचा एक थेंब टाका. बनावट सोने तात्काळ हिरवे होईल. मात्र, शुद्ध सोन्यावर काहीही परिणाम होणार नाही.
शुद्ध सोने पाहण्यासाठी चुंबकही महत्वाची भूमिका बजावते. शुद्ध सोने चुंबकाला चिकटत नाही. मात्र, जरा तरी सोने चुंबकाकडे आकर्षित झाले तर काहीतरी गडबड आहे, असे समजा. सोन्यात भेसळ झाल्याचे ते एक लक्षण आहे. त्यामुळे शुद्ध सोने तात्काळ समजते. सोने खरेदी करताना सोबत चुंबक घेऊन जावे.
पाण्याच्या माध्यमातून शुद्ध सोनेबाबत खात्री करु शकता. शुद्ध सोने पाहण्यासाठी एका कपमध्ये पाणी घ्या. त्यात सोने बुडवा. जर सोने कपाच्या तळाशी राहिले तर ते सोने शुद्ध आहे. सोने तरंग असेल तर ते नकली आहे, हे समजा. सोने कधीही तरंग नाही ते पाण्यात बुडते तसेच कधीही जंग पकडत नाही.
सोने किंमत ही कॅरेटवर ठरवली जाते. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने महाग होते. आपण सोने २४ कॅरेट आणि ज्वलेरी २२ कॅरेटची खरेदी करतो. ज्याची किंमत खूप कमी असते. जर आपल्याला २२ कॅरेट सोन्याची किंमत काढायची असेल तर २४ कॅरेट सोने दराला २४ ने भागा आणि २२ने गुणाकार करा. आपल्याला २२ कॅरेट सोनेची किंमत समजेल. २४ कॅरेट सोने ९९.९ टक्के शुद्ध असते. मात्र, २४ कॅरेटचा दागिना होत नाही. कारण २४ कॅरेटचे सोने एकदम मऊ असते. जास्त करुन २२ कॅरेटचे सोन्याचे चलन आहे.