December 2022 Shubh Yog: असंख्य शुभ योगांचा महिना आला; पाहा तुम्हाला कसा फळेल हा काळ

December 2022 Shubh Yog: यंदाचं वर्ष सुरु कधी झालं आणि संपलं कधी हे लक्षातच आलं नाही. आज 2022 या वर्षातील शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस. 

Updated: Dec 1, 2022, 08:10 AM IST
December 2022 Shubh Yog: असंख्य शुभ योगांचा महिना आला; पाहा तुम्हाला कसा फळेल हा काळ  title=

December 2022 Shubh Yog: यंदाचं वर्ष सुरु कधी झालं आणि संपलं कधी हे लक्षातच आलं नाही (year end 2022). आज 2022 या वर्षातील शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस. या दिवसाची किंबहुना या महिन्याचीच सुरुवात अत्यंत शुभ योगानं झालेली आहे. कारण इथं नक्षत्र आणि ग्रहांची अशी सुरेख स्थिती तयार झाली आहे. जिथं शनी आणि गुरु शश आणि हंस असे पंचमहापुरुष योग बनवत आहे, तिथं रवी आणि हर्षणसारखेही शुभ योग सक्रिय असल्याचं कळत आहे. (December 2022 Shubh Yog mahurat)

आजचा दिवस पूर्वभाद्रपद नक्षत्रामुळंही महत्त्वाचा आहे. थोडक्यात सांगावं या शुभ योगांमध्ये केलेली कामं तितकीच चांगली फळही देतात. यामध्येही देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास तुम्ही तिची खास मार्गानं आराधना करणं अपेक्षित असेल. 

देवीच्या कृपेनं आर्थिक समस्या दूर करण्यासाठीचे उपाय

डिसेंबर महिन्याची (December) सुरुवातच गुरुवारपासून होत आहे. या दिवशी चंद्र आणि सौभाग्याचं प्रतीक असणारा गुरु मीन राशीमध्ये असेल. या परिस्थितीमद्ये पिवळ्या रंगाच्या कापडात नारळ, चांदीचं नाणं, केशर बांधून ते देवीच्या चरणी अर्पण करा. यानंतर ही पोतडी तिजोरीमध्ये ठेवा. हळुहळू आर्थिक समस्या नाहीशा होतील. 

हेसुद्धा वाचा : Panchang, 1 December 2022 : पंचांग पाहूनच ठरवा आजच्या शुभकामांसाठीचे मुहूर्त 

कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी आजच्या दिवशी विष्णूच्या चरणी हळदीची माळ अर्पण करा. यामुळं हळुहळू तुमच्या नोकरीमधील सर्व समस्या दूर होऊ लागतील. या महिन्यात तुम्ही प्रगतीच्या वाटेवरही उल्लेखनीय कामगिरी बजावण्यास सुरुवात कराल. यासाठी श्रीयंत्रावर दूग्धाभिषेक करणं फायद्याचं ठरेल. 

सुख- समृद्धिसाठीचे उपाय 

डिसेंबर महिन्यातच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक दिवसात सुख- समृद्धिचा उपभोग घेण्यासाठी रोज सकाळी तुळशीची पूजा करा. सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावा. कुमारिकांचं पूजन करा. डिसेंबर महिना हा असा महिना आहे जिथं तुम्ही देवादिदेव महादेवांची पूजा केल्यास आशीर्वाद स्वरुपात तुमच्यावर त्यांची कृपा राहील. यासाठी शिवलिंगावर जलाभिषेक करा. यानंतर किमान 11 आणि कमाल 108 बेलपत्रांचा अभिषेक शंकराच्या पिंडीवर करा. 

(वरील संपूर्ण माहिती सामान्य समजुती आणि धारणांच्या आधारे घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)