मेष- आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी आणि व्यवसायामध्ये निर्धारित लक्ष्यावर ठाम राहा. एकाग्रतेने सर्वकामं पूर्ण करा. नव्या भेटीगाठी होतील. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
वृषभ- नव्या संधी आणि नव्या योजनांमध्ये इतरांचा पाठिंबा मिळेल. व्यापारामध्ये यश मिळेल. सकारात्मक राहा. जीवाभावाच्या व्यक्तीप्रतीच्या जबाबदाऱ्या वाढतील. शांत राहा. नव्या व्यक्ती भेटतील.
मिथुन- नव्या संधी मिळतील. काही नवे प्रस्ताव, नोकरीच्या नव्या संधीही मिळतील. आजच्या दिवसभरात तुम्ही तेच कराल, जे करण्याची तुमची इच्छा असेल.
कर्क- जुन्या कामांकडून काही फायदे होतील. जुने मित्रही अचानक मदत करतील. देवदर्शनाचे बेत आखाल. जी कामं अतिशय महत्त्वाची आहेत ती आज पूर्ण करा. काही खासगी अडचणी असल्यास त्यावर तोडगा मिळेल. साथीदार पावलोपावली तुमच्यासोबत असेल.
सिंह- तुमच्या बुद्धीच्या बळावर सर्वकाही सांभाळून नेण्याचा प्रय़त्न कराल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. पुढे जाल. अनेकजण तुमच्यासमोर त्यांच्या अडचणी मांडतील ज्यावर उपाय शोधण्यास तुम्ही त्यांना मदत कराल.
कन्या- ज्यांच्याशी चर्चा कराल त्यात यशस्वी व्हाल. पुढे जाण्याची संधी आहे. कौटुंबीक समस्येमध्ये तुमची भूमिका विचारपूर्वकपणे मांडा. कोणा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमचा विचार बदलेल. लग्नाचा प्रस्ताव मिळेल. व्यवसायात काही बदल करण्य़ाचाही विचार कराल.
तुळ- व्यग्र राहाल. पण, तरीही डोकं शांत ठेवून काम करा. इतरांचं मत गांभीर्याने घ्या. लोकं तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी तुमच्या मनातील गोष्टी बोला. कागदोपत्री व्यवहारांवर लक्ष द्या. कामं सुरळीत पार पडतील. जबाबदारी वाढेल.
वृश्चिक- आज कोणतंतरी प्रकरण किंवा वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल, त्यात यशस्वी व्हाल. जुने वाद मागे लोटत पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. अशी परिस्थिती उदभवेल ज्यामुळे तुमचा विचार करण्याता दृष्टीकोन बदलू शकतो.
धनु- काही कामांमध्ये मित्रांची मदत मिळेल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्य़ाची संधी मिळेल. या संधीचा फायदा घ्या. दिनक्रमात काही बदल करा. मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करा. साथीदाराला पूर्ण वेळ द्या.
मकर- जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा काढण्यावर भर द्याल. त्यात यशस्वी व्हाल. पैशांच्या व्यवहारावर लक्ष द्या. कोणतंही काम विचारपूर्वकपणेच करा. काही कारणांनी जुन्या गोष्टी तुम्हाला आठवतील.
कुंभ- महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता. अधिकारी आणि वरिष्ठांची मदत मिळेल. विचारपूर्वक काम करा. कामाच्या बाबतीत एकाग्रता विचलित होऊ देऊ नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या हाती काही नव्या गोष्टी सोपवण्यात येतील. त्यासाठी तयार राहा. कुटुंबाची साथ मिळेल. प्रवासयोग आहे. जुने वाद मिटतील. शिक्षण आणि मुलाबाळांवर लक्ष राहिल.
मीन- जास्तीत जास्त कामं पूर्ण होतील. त्यामुळे फायदाही होईल. मित्रांच्या साथीने काही कार्यक्रमांचे बेत आखाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कोणता मोठा निर्णय़ घ्याल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच महत्त्वाचे निर्णय घ्या. काही खास माहिती मिळेल.
-दीपक शुक्ला