आजचे राशीभविष्य | मंगळवार | २६ मार्च २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 26, 2019, 08:34 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार | २६ मार्च २०१९ title=

मेष- नवी कामं टाळू नका. नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत ज्या गोष्टींच्या योजना आखल्या आहेत, त्यावर लक्ष द्या. एकाग्रतेने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नव्या व्यक्तींची भेट घडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. अर्थिक अडचणी दूर होतील. 

वृषभ- नव्या संधी मिळतील. तुम्ही आखलेले बेत यशस्वी होतील. व्यापारात यश मिळण्याचे दाट संकेत आहेत. प्रेमाच्या व्यक्तीखातर असणारी जबाबदारी वाढेल. सकारात्मक राहा. कंपनीच्या कोणा एका कामाच्या योजना आखू शकता. शांत राहण्याचा प्रयत्न करा. 

मिथुन- व्यापार, नोकरी आणि अशा अनेक प्रकारच्या ऑफर मिळतील. विचारात असणारी कामं पूर्ण होतील. दिवस उत्साही असेल. हळूहळू यश मिळेल. ज्या जुन्या योजनांवर काम करु शकला नाहीत, ती कामं पूर्णत्वास जातील. स्वत:च्या कामावर लक्ष द्या. 

कर्क- जुन्या कामांचा जास्त फायदा होईल. जुन्या मित्रांची अचानक मदत होईल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत आखाल. जी कामं महत्त्वाची आहेत, ती आजच पूर्ण कराल. दिवस शांततेत व्यतीत होईल. कोणती अडचण असेल, तर त्याविषयीची महत्त्वाची सुचना मिळेल. प्रत्येक गोष्टीत साथीदाराकडून सहकार्य मिळेल. 

सिंह- बुद्धिमत्तेच्या बळावर अनेक गोष्टी निभावून न्याल. नोकरदार वर्गाला सहकाऱ्यांची मदत मिळेल. सहज पुढे जाल. जी कामं तुमच्यावर सोपवण्यात येतील ती पूर्ण करा. जास्तीच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. 

कन्या- पुढे जाण्याच्या संधी मिळतील. कुटुंबात कोणा एका गोष्टीविषयी महत्त्वाचा निर्मय घेतेवेळी तुमचं म्हणणं विचारात घेतलं जाईल. नवे विचार मनात येतील. व्यापारात काही महत्त्वाचे बदल घडतील. 

तुळ- दिवसभर व्यग्र असाल. पण, शांततेनेच काम करा. इतरांचं म्हणणं गांभीर्याने ऐका. अनेकजण तुमचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करतील. कागदोपत्री व्यवहारांवर लक्ष द्या. जबाबदाऱ्यांवर लक्ष द्या. 

वृश्चिक- आज अनेक अडचणी दूर कराल. जुन्या गोष्टी विसरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एखादी अशी गोष्ट तुमच्या समोर येईल जी तुमचे विचार बदलण्यास कारणीभूत ठरेल. दिवस सकारात्मक असेल. तुमच्या नावे एखाद्या मोठ्या यशाचं श्रेय येण्याची चिन्हं आहेत. 

धनु- काही महत्त्वाच्या कामांमध्ये मित्रांची मदत होईल. महत्त्वाच्या कामांसाठी इतरांकडून मदत मिळण्याची चिन्हं. संधीचा फायदा घ्या. दिनचर्येत काही हदल करावे लागू शकतात. मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करा. 

मकर- दिवस चांगला असेल. जास्तीत जास्त कामं पूर्णत्वास न्याल. यशस्वी व्हाल. फक्त पैशांच्या बाबतील थोडी सावधगिरी बाळगा. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. काही जुन्या गोष्टी आठवतील. 

कुंभ- महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घडू शकते. वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. विचारपूर्वकपणेच काम करा. एकाग्रता ठेवा. नोकरीच्या ठिकाणी नवं काम सोपवलं जाऊ शकतं. त्यासाठी तयार राहा. कुटुंबाती साथ मिळेल. प्रवासयोग आहेत. जुन्या वादांवर तोडगा निघेल. 

मीन- अधिकाधिक कामं पूर्ण होतील, ज्यांचा तुम्हालाच फायदा होणार आहे. मित्रांसोबत काही बेत आखाल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. मनात जे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मिळतील.  धीर ठेवा, आज एखादी महत्त्वाची गोष्ट कळेल.