मेष- मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची मदत मिळेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. संपत्तीचा विचार करा. आजचा तुमचा दिवस चांगला आहे. साथीदाराला जास्तीत जास्त वेळ द्या.
वृषभ- कोणत्याही नकारात्मक गोष्टीता विचार करत असाल तर, त्यापासून दूर जा. स्वभाव गोंधळलेला असेल. आरोग्य चांगलं असेल. खाण्यापिण्याच्या सवयी बदला.
मिथुन- नवं काम आणि व्यापारामध्ये काही नव्या संधी मिळतील. कोणती नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या भेटीगाठी होतील. आजच्या दिवशी ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याकडे भावना व्यक्त करा.
कर्क- प्रेमसंबंधांमध्ये काहीसा तणाव येईल. पण, विषय जास्त ताणून धरू नका. विचाराधीन कामं पूर्ण होण्यास काहीसा वेळ लागेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह- विचाराधीन कामं पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचला. अनेक गोष्टींमध्ये तुम्ही गुंतलेले असाल. कामात काही अडचणी येतील. एकाग्रता राखा.
कन्या- व्यवसायात काही नव्या संधी मिळतील. अपूर्ण कामं पूर्म करण्याचा प्रयत्न करा. मन प्रसन्न असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. अचानक एखाद्या व्यक्तीची आठवण येईल आणि त्या व्यक्तीला भेटण्याचीही संधी मिळेल.
तुळ- नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला आहे. आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. साथीदाराकडून एखादं सरप्राईज मिळण्याची संधी आहे. आरोग्य चांगलं असेल.
वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी तुमच्या प्रतिक्षेत आहेत. नुकसान होऊ शकतं. सावधगिरी बाळगा. मन नसतानाही काही व्यक्तींची भेट घडेल.
धनु- आर्थिक व्यवहारांमध्ये गोंधळ होईल. दाम्पत्य जीवन सुखी असेल. विनम्रतेने वागा. मोठ्या अडचणी दूर होतील. फक्त काही वेळ द्या. अडचणी दूर होतील. फक्त आरोग्याची काळजी घ्या.
मकर- आज दिवसभर सावधगिरी बाळगा. काही व्यक्ती त्यांच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करतील. काही अपूर्ण कामं आज पूर्ण होतील. आरोग्याची आणि साथीदाराची काळजी घ्या. आज प्रेम व्यक्त करताना अतिशयोक्ती नको. खऱ्या भावनाच पुरेशा असतील.
कुंभ- नोकरीच्या ठिकाणी स्वत:वर ताबा ठेवा. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी दूर होतील. अडचणी दूर होतील. पुढच्या कामांचे बेत आखा.
मीन- व्यवसायामध्ये काही नवं करण्याचा प्रयत्न करा. अडचणी स्वीकारा. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही कारणामुळे तणावाची परिस्थिती उदभवेल. पण, गोंधळून जाऊ नका.