Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणाला 12 वर्षांनी Chaturgrahi Yog! भारतात दिसणार छायाकल्प ग्रहण

Chandra Grahan 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज आहे. तब्बल 12 वर्षांनी चंद्रग्रहणाला चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. असा हा चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याचं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 5, 2023, 09:08 AM IST
Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणाला 12 वर्षांनी Chaturgrahi Yog! भारतात दिसणार छायाकल्प ग्रहण  title=
Chandra Grahan 2023 in india date timings sutak kaal time lunar eclipse Buddha Purnima upay in marathi

Chandra Grahan 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) आज असून यासोबत आज वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध जयंतीदेखील आहे. यंदाचं चंद्रग्रहण खास आहे. रात्री चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने छायाकल्प (मांद्य) चंद्रग्रहण असणार आहे. याशिवाय मेष राशीमध्ये 12 वर्षांनंतर सूर्य, बुध, गुरु आणि राहूचा चतुर्ग्रही योग (Chaturgrahi Yog 2023) जुळून आला आहे. (astrology news in marathi)

भारतात दिसणार का? (Chandra Grahan 2023 in india)

वर्षातील पहिलं सूर्यग्रहण(first eclipse of year 2023) हे भारतात दिसलं नव्हतं. त्यामुळे चंद्रग्रहण दिसणार आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यात काही जण भारतात दिसणार आहे असं म्हणतं आहेत. आजचं चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे, असं पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण (D K SOMAN) यांनी सांगितलं आहे. (Chandra Grahan 2023 in india date timings sutak kaal time lunar eclipse Buddha Purnima upay in marathi )

किती वाजता दिसणार चंद्रग्रहण? (Chandra Grahan 2023 date and time)

आज रात्री 8 वाजून 44 मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल. रात्री 10 वाजून 53 मिनिटांनी तो जास्तात जास्त विरळ छायेत (ग्रहण मध्य) येईल. त्यानंतर उत्तररात्री 1 वाजून 2 मिनिटांनी चंद्र विरळ छायेतून बाहेर पडेल, असं सोमण यांनी सांगितलं आहे. 

हेसुद्धा वाचा - Horoscope Today : ग्रहांच्या अद्वितीय मिलनासह आजचं चंद्रग्रहण! 'या' लोकांचं भाग्य चंद्रसारखं चमकणार

चंद्रग्रहण कुठे दिसणार?

त्याशिवाय सोमण म्हणतात की, या प्रकारच्या चंद्रग्रहणात धार्मिक नियम पाळायचे नसतात. हे छायाक्लप चंद्रग्रहण आहे जे भारतासह युरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक अटलांटिक आणि हिंदी महासागरात दिसणार आहे.

वर्षातील दुसरं चंद्रग्रहण कधी आहे? (Second Chandra Grahan 2023 Date)

या वर्षी एकूण चार ग्रहण असणार आहे. त्यातील सूर्यग्रहण झालं असून आज चंद्रग्रहण आहे. दुसरं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 पाहता येणार आहे. हे वर्षातील शेवटचं ग्रहण असणार आहे.  तर दुसरा सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला 2023 असणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Vaishakh Purnima 2023 : आज वैशाख पौर्णिमेला 130 वर्षानंतर विशेष योग, Chandra Grahan असल्याने स्नान आणि दान करायचं का?

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)