'या' लोकांसोबत मैत्री करणे म्हणजेच संकट ओढवून घेणे, चाणक्य नितीतील श्लोकात सांगितलंय कारण

Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास व्यक्तीच्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 10, 2024, 03:53 PM IST
'या' लोकांसोबत मैत्री करणे म्हणजेच संकट ओढवून घेणे, चाणक्य नितीतील श्लोकात सांगितलंय कारण title=
chanakya niti give warning making friendship with these bad people in marathi

Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले उपदेश चाणक्य निती असं म्हणतात. चाणक्य यांनी आयुष्यात येणाऱ्या कटू-गोड प्रसंगांवर कसा मार्ग काढायचा याची शिकवण त्यांनी दिली आहे. आयुष्यात यश मिळवायचे असेल किंवा मानव हित संदर्भातील अनेक प्रसंग आचार्य चाणक्य यांनी यात नमूद केले आहेत. जे लोक चाणक्य नितीचे पालन करतात ते कधीच अपयशी होत नाहीत. नात्यात त्यांना कधीच धोका मिळत नाही. या लोकांना यश मिळतेच. आजच्या घडीला लोक चाणक्य नितीबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. 

चाणक्य नितीमध्ये आज आपण जाणून घेऊया की, दृष्ट व्यक्तीसोबत हुशारीने व्यवहार कसा करायचा. मैत्री करणे आणि त्यांना योग्य सल्ला देणे हे दोन्हीही व्यर्थ आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य यांनी असं का म्हटलं आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. चाणक्य नितीन याबाबत काय म्हटलंय हे पाहूया. 

चाणक्यची निती काय आहे?

न दुर्जनः साधुदशामुपैति बहुप्रकारैरपि शिक्ष्यमाणः।

आमूलसिक्त: पयसा घृतेन न निम्बवृक्षो मधुरत्वमेति ।।

आचार्य चाणक्य यांनी दृष्ट व्यक्तीची तुलना कडुलिंबाच्या झाडासोबत केली आहे. चाणक्य यांनी त्यांच्या श्लोकमध्ये म्हटले आहे की, दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही समजावले तरी तो सतत पाप कर्मच करत राहिल आणि एकाही सज्जन व्यक्तीसारखं काम करणार नाही. जसं की तुम्ही कडुलिंबाच्या झाडाला दूध किंवा तुपाचा अभिषेक केला तरी त्याची पाने कडूच राहणार आहेत. यात काहीच बदल होणार नाही आणि ती गोड असतील या अपेक्षेने चाखल्यास अंतिमतः दुखःच होणार आहे. त्याचप्रमाणे दृष्ट व्यक्तीसाठी तुम्ही कितीही चांगले करा ती व्यक्ती त्याचा पापी स्वभाव कधीच सोडत नाही. शेवटी तो लोकांच्या दुखाचे कारणच बनतो. 

यांच्याशी मैत्री नकोच

आचार्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. अनेकदा दृष्ट व्यक्तीसोबत चांगलं वागलं तरी ते सज्जन बनू शकत नाही. अशी व्यक्तीकडून कोणत्याही चांगल्या कामाची अपेक्षा करणे स्वतःलाच दुख देणे आहे. दृष्ट व्यक्तींना त्यांना त्यांच्या कर्मानेच वागू द्यावे. कारण त्यांच्यात नेहमी दोषच आढळतात. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे आपल्यालाच मोठ्या संकटात टाकू शकतात आणि शेवटी आपल्याला पश्चात्ताप करण्या पलीकडे काहीच भेटत नाही. त्यामुळं संधी साधताच त्यांच्यापासून लांब व्हा. नाहीतर त्यांच्यामुळं तुम्ही संकटात सापडू शकता. आणि त्यांना योग्य मार्ग दाखवायच्या नादात तुमची किमती वेळ व्यर्थ होईल. आचार्य चाणक्य म्हणतात की त्यांची संगत तर चांगली नाहीच पण त्यांची दोस्तीही नकोच. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)