Chanakya Niti On Success : यश मिळत नाही तर ते मिळवावे लागते. त्यासाठी कष्ट करण्याचा जिद्द असावी लागते. जास्त मेहनत घेतली तर यश तुमच्यापासून लांब राहत नाही. मात्र, यश मिळण्यासाठी चाणक्यनितितील काही गोष्टींचा अबलंब केला किंवा त्यांना नेहमीच्या जीवनात स्थान दिले तर आपल्याला यस मिळण्यास मदत होते. यशाच्या वाटेवर अनेक प्रकारचे अडथळे येतात ज्यामुळे आपला संयम देखील सुटतो. मन अस्वस्थ होते, पण चाणक्यनिति अबलंबली तर यश मिळण्यास मदत होईल. त्यासाठी रोज सकाळी ही 5 कामे नित्य नियमाने केली तर यशाच्या मार्गातील अडथळा दूर होईल. त्यासाठी तुम्हाला
1. सकाळी लवकर उठले पाहिजे
जास्त मेहनत करायची असेल आणि तशी जिद्द मनात असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठले पाहिजे. तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. जर आपल्याला आपले ध्येय साध्य करायचे असेल तर आपल्याला क्षणाचाही विलंब करता कामा नये. एक क्षणही वाया न घालवता आपल्याला दैनंदिन दिनर्चया लक्षात ठेवायला हवी. त्यासाठी सकाळी वेळेत उठायला हवे. आपले काम नित्याने केले पाहिजे.
2. दिवसभराचे नियोजन हवे
तुम्हाला दिवसभरात काय काय करायचे आहे. याचा नियोजन केले पाहिजे. त्यामुळे तु्मचा काम करताना गोंधळ होणार नाही. चाणक्य सांगतात की सकाळी उठल्यानंतर वेळ वाया घालवू नका. आपल्यातील आळस झटकून तात्काळ कामाला लागले पाहिजे. तसेच नियोजनाप्रमाणे कामाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या यशाचा मार्ग सोपा होता. त्यासाठी नियोजन हे महत्त्वाचे असते.
3. कोणतेही काम उद्यावर ढकलू नका, आजच करा
चाणक्य नितित सांगितले आहे, की आजचे काम आजच केले पाहिजे. आजचे काम उद्यावर ढकलू नका. त्यामुळे तुम्ही केलेले नियोजन बिघडण्याची शक्यता असता. चाणक्य म्हणतात, पैसे कधीही मिळवू शकू पण निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच मिळत नाही. त्यासाठी कोणतेही काम हे वेळत करायला हवे. परिस्थितीत परत येत नाही. त्यासाठी हाती घेतलेले काम उद्यावर पुढे ढकलू नका, वेळेचा उपयोग केला तर प्रत्येक कामात यश मिळतेच.
4. निरोगी राहण्यावर भर द्या
आपले आरोग्य चांगले असेल तर काम करण्यासाठी उत्साह राहतो. त्यामुळे आपले आरोग्य चांगले कसे राहिल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही, जर त्याने वेळेवर चांगले आणि पौष्टिक अन्न खाल्ले तर आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहतो. त्यामुळे काम करताना उत्साह वाढतो. यातून तुम्ही यशाकडे वाटचाल करता.
5. व्यायामावर भर दिला पाहिजे
आपण चांगले तर आपला दिवसही चांगला जातो. कोणतेही काम करताना शरीराने साथ देणे आवश्यक असते. तर काम करताना थकवा जाणवत नाही. शरीर स्वास्थ्य महत्त्वाचे असते. कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी शरीर चांगले असावे. यासाठी तुम्ही व्यायामावर भर दिला पाहिजे. तुम्हाला स्वप्नांना अर्थपूर्ण बनवायचे असेल तर दररोज सकाळी योगासने आणि व्यायामासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. तुम्ही निरोगी राहाल तर पूर्ण शक्ती लावून काम करु शकता. त्यामुळे यशापर्यंत मजल मारता येते.
(Disclaimer: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. Zee 24 Taas याची पुष्टी करत नाही.)