Broom Vastu Tips : तुम्ही झाडू मारताना 'या' 3 चुका करत नाही ना? आजच सुधारा नाहीतर कुटुंबांवर मोठे संकट

Vastu Tips for Broom : आपण घरी स्वच्छतेला प्राधान्य देत असतो. घर प्रसन्न वाटण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी आपण सर्वच घराचा साफसफाई करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठीही काही वास्तू नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करुन कुटुंबाला धोक्यात घालू नका. 

Updated: Jun 24, 2023, 08:55 AM IST
Broom Vastu Tips : तुम्ही झाडू मारताना 'या' 3 चुका करत नाही ना? आजच सुधारा नाहीतर कुटुंबांवर मोठे संकट title=
Broom Vastu Rules

Broom Vastu Rules : आपण नेहमी घर स्वच्छ करण्यासाठी प्राधान्य देत असतो. घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाडूचा वापर करत असतो. मात्र, काही वास्तू नियम आहेत. त्यामुळे झाडूचा कधी वापर करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. झाडू मारताना काही चुका झाल्या तर त्या तुमच्यासाठी आणि कुटुंबासाठी धोकादायक असू शकतात.  घरातील स्वच्छतेसाठी झाडू वापरणे सामान्य आहे. पण याच्याशी संबंधित अनेक नियम आहेत, ज्यांचे पालन आपण जरुर केले पाहिजे, अन्यथा संकट यायला वेळ लागत नाही. वास्तुशास्त्रात झाडूशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये झाडू ठेवण्याची वेळ, ठिकाण आणि पद्धत तपशीलवार सांगितली आहे. असे म्हटले जाते की या नियमांचे पालन न केल्यास झाडूचा अनादर होतो, ज्यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो. त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. 

घरी झाडू कधी मारु नये !

आपण नेहमी घर स्वच्छ करण्यासाठी झाडू मारत असतो. वास्तुशास्त्रानुसार, जर एखादी व्यक्ती घराबाहेर जात असेल, तर त्या वेळी चुकूनही झाडू  मारु नये. असे करणे शिष्टाचार आणि वास्तू नियम या दोन्ही दृष्टीने चुकीचे मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो असे म्हणतात. यासोबतच घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या कपड्यांवर धूळ किंवा कचरा पडला तर त्या व्यक्तीचा मूड खराब होतो, त्यामुळे होणारे काम बिघडते. 

जेवण करताना झाडू मारण्याचे काम करु नये

वास्तूचे काही नियम आहे. वास्तू तज्ज्ञ म्हणतात की कोणी अन्न शिजवत असेल किंवा जेवण करत असेल तरीही झाडू वापरु नये. असे केल्याने धुळीचे कण अन्नात पडू शकतात. अशा प्रकारचे आचरण शिष्टाचाराच्या विरुद्ध मानले जाते आणि ते माता अन्नपूर्णेचा अपमान होतो. जर एखादी व्यक्ती अंघोळ करुन बाहेर पडली तर त्याने त्या वेळी झाडू मारणे हे देखील टाळावे. याचे परिणाम जीवनात संकटांच्या रुपाने भोगावे लागतात. 

चुकूनही या ठिकाणी कचरा ठेवू नका

आपण घराची सफाई करतो. त्यासाठी  झाडूचा उपयोग करतो. झाडू केल्यानंतर जो कचरा बाहेर पडतो तो कधीही घराच्या दाराजवळ ठेवू नये, डस्टबिन जवळ तेथे ठेवू नये, असे धार्मिक अभ्यासक सांगतात. माता लक्ष्मी आणि देवता मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करतात असे मानले जाते. अशा स्थितीत मुख्य गेटवरच कचऱ्याचा ढीग टाकला तर देवी-देवतांचा कोप होतो, त्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)