Bhutadi Amavasya 2023 : आज अमावस्या आणि मंगळाचा उत्तम संयोग! 'या' राशींनी करा 'हे' खास उपाय, शनिदेवाचा अशुभ प्रभाव होईल दूर

Bhutadi Amavasya 2023 Date : आज फाल्गुन महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023) आहे...अमावस्या  (Bhaumvati Amavasya) ही अशुभ मानली जाते. पण हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्याला विशेष महत्त्व आहे. आजची अमावस्या खूप खास आहे. अमावस्या आणि मंगळाचा उत्तम संयोग आला आहे. त्यामुळे राशींनुसार ही कामं करा. 

Updated: Mar 21, 2023, 07:05 AM IST
Bhutadi Amavasya 2023 : आज अमावस्या आणि मंगळाचा उत्तम संयोग! 'या' राशींनी करा 'हे' खास उपाय, शनिदेवाचा अशुभ प्रभाव होईल दूर title=
Bhaumvati Amavasya Bhutadi Amavasya or Chaitra Amavasya 2023 shani sade and dhaiya upay for zodiac signs in marathi

Bhaumvati Amavasya Pitra Dosh Upay in marathi :  हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षाला (Gudipadwa 2023) सुरुवात करण्यापूर्वी आज पितृदोष नाहीसे करण्यासाठी खूप खास अमावस्या (Bhutadi Amavasya 2023 Date) आहे. त्यात आज मंगळवार...एक शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे शनिदोष असल्यास आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात खास उपाय सांगण्यात आले आहेत. चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023) ही पितृदोष (sings of pitra dosh) आणि शनिदोष या संकटातून काढणारी ठरणार आहे.  (Astrology News in marathi)

भौमवती अमावस्या शुभ योग  (Bhutadi Amavasya 2023 date, Puja Vudhi and Subha Yog)

21 मार्च 2023  मंगळवारी - सकाळी 12:42 

सर्वार्थ सिद्धी योग - 21 मार्च 2023  मंगळवारी संध्याकाळी 05:25 पासून बुधवारी पहाटेपर्यंत

शनिदोष उपाय (shani sade and dhaiya upay)

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला गेला आहे. आज मंगळवार म्हणजे गणपती आणि हनुमानजींचा वार...धार्मिक मान्यतांनुसार अमावस्येला पितृदोषासोबतच शनिदेवाचा अशुभ प्रभाव वाढतो.  शनिची साडेसाती (shani sade sati) आणि धैय्यामुक्तीसाठी तूळ  (Libra), वृश्चिक (Scorpio), मकर (Capricorn), कुंभ (Aquarius) आणि मीन (Pisces) राशींनी आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय केल्यास त्यांना फायदा होईल. (Bhaumvati Amavasya Bhutadi Amavasya or Chaitra Amavasya 2023shani sade and dhaiya upay for zodiac signs in marathi )

हनुमान चालिसापाठ

अमावस्येला हनुमान चालिसा पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि हनुमानजीची विशेष आशीर्वाद मिळतो. 

सुंदरकांड पाठ 

हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार सुंदरकांड पाठ करा. सगळ्या समस्या दूर होतील. 

श्री रामाचे नामस्मरण

ज्योतिषशास्त्रानुसार वर सांगितलेल्या राशींनी प्रभू श्री रामाचे नामस्मरण करावे. श्री राम जय राम जय जय राम या सिया राम जय राम जय जय राम, असं मंत्र म्हणा. याशिवाय रामाचे कुठलेही नामस्मरण केल्यास तुम्हाला विशेष लाभ होईल. 

हा नैवेद्य करा!

श्रद्धेनुसार हनुमानजींना सात्विक नैवेद्य अर्पण करा. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)