Grah Lakshmi Yoga : 'या' राशीत तयार होणार 'ग्रह लक्ष्मी योग'! ही लोक होणार प्रंचड श्रीमंत

Grah Lakshmi Yoga : ग्रह गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ असे योग तयार होत असतात. अशातच येत्या काही दिवसांमध्ये काही राशींमध्ये ग्रह लक्ष्मी योग तयार होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Sep 25, 2023, 05:30 AM IST
Grah Lakshmi Yoga : 'या' राशीत तयार होणार 'ग्रह लक्ष्मी योग'! ही लोक होणार प्रंचड श्रीमंत  title=
astrology Top 5 zodiac signs will earn money and rich on Grah Lakshmi Yoga in marathi

Grah Lakshmi Yoga :  ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. 12 राशींच्या जन्मकुंडलीतून भविष्याचा अंदाज सांगितला जातो. येत्या काही दिवसांमध्ये गृहलक्ष्मी योग काही राशींच्या कुंडलीत तयार होणार आहे. या योगामुळे लक्ष्मी माता तुमचं दार ठोठवणार आहे. त्यामुळे घरात सुख, शाती आणि ऐश्वर्या नांदणार आहे.  (astrology Top 5 zodiac signs will earn money and rich on Grah Lakshmi Yoga in marathi )

मेष (Aries Zodiac)

या योग काळात तुमची अध्यात्मात रुची वाढणार आहे. पूजा आणि धार्मिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे. काही गैरसमज आणि सततचे वाद कौटुंबिक वातावरण निराशाजनक करणार आहे. ही परिस्थिती तुम्हाला तणावग्रस्त बनवणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्‍यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी वाद टाळा. कामासाठी तुम्हाला बाहेरगावी जावं लागणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने तुम्हाला सुख लाभणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac)

गृहलक्ष्मी योगामुळे तुमच्या पद आणि प्रतिष्ठा लाभणार आहे. वडिलोपार्जित गोष्टीतून तुम्हाला लाभ होणार आहे.. ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे.  प्रशासकीय बाबी उत्तम होणार आहे. कुटुंबाशी जवळीक या काळात वाढणार आहे. चैनीच्या वस्तूंकडे लक्ष द्या. 

सिंह (Leo Zodiac)

कामाच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या अधिकृत क्षेत्रात बदल होणार आहे. यातून तुम्हाला फायदा होणार आहे.  गृहलक्ष्मी योगामुळे प्रगतीचे अनेक मार्ग खुले होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेली समस्या संपणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कारण तुमची बढती पाहून तुमचे सहकारी नाराज होणार आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

ऑफिसमध्ये तुम्हाला जबाबदारीचे काम मिळणार आहे.  यातून तुम्हाला फायदा होणार आहे.  विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचे योग आहेत. तुमचा प्रवास सुखकर होणार आहे. मुलांकडून तुम्हाला आनंदाचा अनुभव मिळणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

येणारे दिवस तुमच्या संपत्ती, कीर्ती आणि वैभवात वाढ करणारा ठरणार आहे. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करणार असाल तर विचारपूर्वक करा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. विरोधकही तुमच्या बोलण्याने त्रस्त होणार आहेत. तुम्ही करत असलेले कोणतेही काम ते बिघडवण्याची शक्यता आहे. तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत. कर्जफेड करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)