Napunsak Yog : कुंडलीत 'हा' योग असल्यास पुरुष नपुंसक होऊ शकतात, 'हे' उपाय करा

Astro Tips : ज्योतिषशास्त्रात कुंडलीला विशेष महत्त्व आहे. लग्नात मुला मुलीची कुंडली पाहिल्याशिवाय लग्न करत नाही. कारण या कुंडलीत ग्रह तारे आणि योग तुमचं भविष्य सांगतं. अनेकांच्या कुंडलीत कुठला ना कुठला योग असतो. आज आपण नपुंसक योग कसा तयार होता त्याबद्दल जाणून घेणार आहोत.   

Updated: Jan 30, 2023, 02:09 PM IST
Napunsak Yog  : कुंडलीत 'हा' योग असल्यास पुरुष नपुंसक होऊ शकतात, 'हे' उपाय करा title=
astrology kundali napunsak yog and napunsak yog remedy marathi news

Napunsak Yog  :  हिंदू धर्मात ग्रह ताऱ्यांना विशेष महत्त्व आहे. बाळाच्या जन्माताच त्याची कुंडली तयार केली जाते. कारण हिंदू धर्मात कुंडलीशिवाय कुठलीही कामं होतं नाहीत. अगदी लग्न ठरवतानाही कुंडली फार गरजेची असते. मुला मुलीचे किती गुण मिळतात यावर त्यांचं नातं ठरवलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांनुसार व्यक्तीमध्ये कामवासना आणि नपुंसकता येते. ज्योतिषशास्त्रात लैंगिक संबंधांबाबत व्यक्तीच्या कुंडलीतील सातवे आणि आठवे बघितले जाते. जर कुंडलीत ही दोन्ही घरे बरोबर नसतील तर व्यक्तीमध्ये नपुंसकता येऊ शकते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.  चला जाणून घेऊया अशी कोणती स्थिती आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये लैंगिक संबंधांबद्दल अनास्था आणि नपुंसकतेची भावना निर्माण होते.

'ही' ग्रह महत्त्वाची 

ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये सूर्य, मंगळ, गुरु, राहू हे अशुभ ग्रह मानली जातात. तर चंद्र, शुक्र हे स्त्रीलिंगी ग्रह आहेत. तर बुध, शनि आणि केतू यांना नपुंसक ग्रहांच्या श्रेणीत ठेवण्यात आलंय. अशाप्रकारे हे 9 ग्रह त्यांच्या स्थितीनुसार पुरुष आणि स्त्री शिवा नपुंसक गुण प्रकट करतात. ग्रहांप्रमाणे 12 राशींची चिन्हे देखील नर आणि मादीमध्ये विभागली जातात. या 6 राशींमध्ये मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु, कुंभ हे पुरुष राशी आहेत तर वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन हे स्त्री राशी आहेत. अशा स्थितीत जेव्हा स्त्री ग्रह पुरुष राशीत आणि पुरुष ग्रह स्त्री राशीत येतात तेव्हा त्यांचाही वेगवेगळ्या प्रकारे लोकांवर प्रभाव पडतो. (astrology kundali napunsak yog and napunsak yog remedy marathi news)

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू किंवा शनि दुसऱ्या भावात असतो आणि बुध आठव्या भावात तसंच चंद्र निद्रास्थानी म्हणजेच बाराव्या भावात असतो, त्यांना कामवासना किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे नपुंसकतेची भावना असते. 

कुंडलीत चंद्र ज्या घरात बसला असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला शनि, राहू, केतू, मंगळ असे कोणतेही अशुभ ग्रह बसले असतील तर पाप कर्तरी योग तयार होतो. जो शुभ फळ कापण्याचे काम करतो. जर कुंडलीत हा योग तयार झाला असेल आणि कुंडलीच्या आठव्या घरात शनी, केतू किंवा बुध यापासून कोणताही अशुभ ग्रह असेल तर व्यक्ती नपुंसक बनण्याची किंवा लैंगिक इच्छा कमी होण्याची शक्यता असते.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत फक्त बुध आठव्या भावात असेल आणि त्याला गुरु, शुक्र, चंद्र यांसारख्या कोणत्याही शुभ ग्रहाने लक्ष दिले नाही, तर त्या व्यक्तीमध्ये लैंगिक क्षमतेची कमतरता असू शकते किंवा त्याबद्दल न्यूनगंड असू शकतो.

ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्रासोबत शनि किंवा राहू बसले असतील तर त्या व्यक्तीमध्ये लैंगिक शक्तीची कमतरता होऊ शकते. कुंडलीत सातव्या घरात शुभ ग्रह असल्यास परिस्थिती थोडी चांगली असते. कुंडलीत आठव्या भावात राहु आणि केतू यापैकी कोणताही एक ग्रह असल्यास आणि त्यासोबत शुक्र किंवा चंद्र यापैकी एक व्यक्ती नपुंसकता येण्याची शक्यता असते. जर कुंडलीत आठव्या भावात शुक्र असेल आणि कुंडलीच्या दुसऱ्या घरात मंगळ किंवा शनी शुक्राची स्थिती करत असेल तर त्या व्यक्तीला संतती सुख मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

उपाय

1. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात या प्रकारची स्थिती बनली असेल, तर सर्वात आधी एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

2. जर एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये हा योग बनत असेल, तर त्याला सूर्य देवाची पूजा करणे गरजेचं आहे. 

3. रोज सकाळी उठल्यावर सूर्य देवाला अर्घ अर्पण करा. 

4. तुमच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या. 

5. रोज योगा करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)