मेष- जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडतील. आजच्या दिवशी गुलाबी रंगाची वस्त्र तुम्हाला फायद्याची ठरणार आहेत.
वृषभ - आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडणार आहे. कामाचा व्याप वाढू शकतो.
मिथुन- आठवड्याच्या शेवट आहे. एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याची बेत आखाल. मित्रपरिवाराची भेट घडणार आहे. संयम ठेवा.
कर्क- तणाव वाढेल. कामाच्या व्यापासोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील.
सिंह - आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात उगाचच वाद होतील. आजचा दिवस काहीचा बेताचा असेल.
कन्या- करिअरमध्ये सुधारणा होतील. आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या जुन्या मित्राची भेट घडेल.
तुळ- अडकलेली कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसेही मिळणार आहेत. कुटुंबाला आधार द्याल. मोठ्यांचे सल्ले ऐका.
वृश्चिक - मानसिक तणाव वाढू शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा. आई- वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे.
धनु- वैवाहिक आयुष्यात सुधारणा येतील. वडिलधार्यांचा सल्ला लक्षात ठेवा, तोच मोलाची मदत करणार आहे.
मकर- विवाहोत्सुकांना लग्नाचे प्रस्ताव येतील. अती घाईनं काम करु नका. संयम ठेवा.
कुंभ- आज कुटुंबाच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. धार्मिक कामाच सहभागी व्हाल. आर्थिक अडचणी दूर जातील.
मीन- नोकरीमध्ये एखादी नवी संधी मिळू शकते. त्या संधीचं सोनं करा. सर्वांना सोबत घेऊन पुढे चला.