हे लोक खूप नशिबान असतात; ज्यांच्या तळहातावर अशी असते निशाणी, त्यांना कधीच भासत नाही पैशाची कमतरता

Temple Sign: ज्योतिषशास्त्राप्रमाणे हस्तरेषाशास्त्रालाही खूप महत्त्व आहे. यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर असलेल्या रेषा आणि खुणा पाहून खूप काही अंदाज लावता येतो किंवा बांधता येतो.

Updated: Sep 16, 2022, 03:15 PM IST
हे लोक खूप नशिबान असतात; ज्यांच्या तळहातावर अशी असते निशाणी, त्यांना कधीच भासत नाही पैशाची कमतरता  title=

Temple Sign on palm: ज्योतिषशास्त्रातील कुंडली पाहून एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही कळू शकते. त्याचप्रमाणे हस्तरेषाशास्त्रालाही खूप महत्त्व आहे. हस्तरेषाशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील रेषा आणि चिन्हे पाहून भविष्याबद्दल बरेच काही सांगता येते. तळहातावर अनेक रेषा आणि खुणा दिसत असतात. असे मानले जाते की या निशाणी आणि चिन्हे असलेल्या लोकांचे नशीब पालटते. यापैकी काही खूप भाग्यवान असतात. त्यांना आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही. आज आम्ही अशाच एका निशाणीबद्दल सांगणार आहोत.

मंदिराची निशाणी

माणसाच्या तळहातावर अनेक प्रकारच्या खुणा आणि रेषा दिसतात. यापैकी एक खूण मंदिराची आहे. हे चिन्ह फार कमी लोकांच्या तळहातावर दिसते, म्हणून ते खूप भाग्यवान मानले जाते. हस्तरखा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर हे चिन्ह असते. त्यांना आयुष्यात सर्वकाही मिळते. पैशाची कधीच कमतरता भासत नसते. त्यांना जगभर आदर आणि मानसन्मान मिळतो.

जागतिक कीर्ती मिळते

मंदिराची खूण असल्यास, तळहातावर प्रथम एक चौकोन तयार होतो आणि त्यावर त्रिकोण तयार होतो, ज्यामुळे मंदिरासारखी रचना होते. सूर्य रेषेवर असलेल्या मंदिराच्या चिन्हामुळे माणसाची कीर्ती जगभर पसरते. त्याचबरोबर ज्या लोकांच्या तळहातावर केतू पर्वतावर मंदिराचे चिन्ह असते. असे लोक खूप आध्यात्मिक असतात.

समाजात प्रतिष्ठा वाढते

ज्याच्या तळहातावर मंदिराची खूण आहे, त्याच्यावर कोणीही कितीही काही केले तरी होत नाही.  या लोकांना समाजात खूप प्रसिद्धी मिळते. त्याचबरोबर मंदिराच्या चिन्हावर ध्वजासारखी रचना असेल तर ती अधिक शुभ मानली जाते. अशा लोकांवर भगवंताची मोठी कृपा असते.